शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याचा मोबाईल चोरणाऱ्यास अटक, जांभवडेतील युवकावर होता संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:07 IST

हॉटेलमध्ये एकत्र बसलेले असतानाच शाळकरी मुलाचा मोबाईल चोरल्याबाबत गुन्हा दाखल असलेल्या किशोर अंकुश मडव (३६ रा. जांभवडे - देऊळवाडी) याला कणकवली पोलिसांनी कणकवली - बाजारपेठ येथे अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जगदिश बांगर व कॉन्स्टेबल वैभव कोळी यांनी केली. ही चोरीची घटना २७ सप्टेंबरला घडली होती.

ठळक मुद्देविद्यार्थ्याचा मोबाईल चोरणाऱ्यास अटकजांभवडेतील युवकावर होता संशय

कणकवली : हॉटेलमध्ये एकत्र बसलेले असतानाच शाळकरी मुलाचा मोबाईल चोरल्याबाबत गुन्हा दाखल असलेल्या किशोर अंकुश मडव (३६ रा. जांभवडे - देऊळवाडी) याला कणकवली पोलिसांनी कणकवली - बाजारपेठ येथे अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जगदिश बांगर व कॉन्स्टेबल वैभव कोळी यांनी केली. ही चोरीची घटना २७ सप्टेंबरला घडली होती.याबाबत तक्रार १६ वर्षीय मुलानेच पोलिसांत दिली होती. त्यानुसार हा मुलगा गावातीलच एकाच्या चारचाकीने कणकवलीला आला होता. त्यावेळी त्यांच्यासमवेत संशयीत किशोर मडव व अन्य एकजण होता. येथे एका ठिकाणी डिश टिव्हीच्या सेटटॉप बॉक्सची वायर घेऊन मुलगा, सोबतचे तिघे व त्यांना कणकवलीत मिळालेला अन्य एक असे पाचहीजण दुपारी १२ च्या सुमारास सह्याद्री हॉटेलमध्ये आले. येथील एका टेबलावर ते बसले होते. पुढे खाणे - पिणे झाल्यानंतर एकजण काऊंटरवर बिल देण्यासाठी गेला असता हा मुलगाही त्याच्या मागोमाग गेला.त्यावेळी त्याने मोबाईल टेबलावरच ठेवला होता. त्यांच्यापैकी करंदीकर बिल देत असतानाच संशयीत किशोर मडव तेथून उठून गेला. त्यानंतर मुलाने टेबलावर पाहिले असता मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. विचारणा केली असता उपस्थितांपैकी सर्वांनीच आपण मोबाईल घेतला नसल्याचे सांगितले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी मुलाने पुन्हा सह्याद्री हॉटेल गाठले. यावेळी सीसीटीव्हीमध्ये किशोरनेच मोबाईल चोरल्याचे दिसून आले. अखेर मुलाने पोलीस ठाणे गाठत त्याच्याविरोधात तक्रार दिली. मात्र, संशयिताला याची कुणकुण लागल्याने तो पसार झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग