वाहून जाणाऱ्या युवकाला जीवदान
By Admin | Updated: July 31, 2014 23:28 IST2014-07-31T22:14:42+5:302014-07-31T23:28:49+5:30
रात्री दीड वाजता कामावरुन घरी जाताना

वाहून जाणाऱ्या युवकाला जीवदान
सावंतवाडी : तालुक्यात बुधवारी पावसाचा जोर कायम असताना रात्री दीड वाजता कोलगाव येथील काजरकोंड पुलावरुन पाण्याच्या प्रवाहासह वाहून जाणाऱ्या युवकाला सागर कांदळगावकर व दिनेश गावडे यांनी वाचविले.बुधवारी संध्याकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाणी आल्याने येण्याजाण्याचे मार्ग बंद झाले होते. कोलगाव येथील काजरकोंड या पुलालाही पाणी आले होते. यावेळी सय्यद मकानदार रात्री दीड वाजता कामावरुन घरी जाताना पुलावरील पाण्याचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे ते वाहून जाऊ लागले. त्यांनी जवळच्या झाडाचा आधार घेतला. तेथे राहणाऱ्या सागर कांदळगावकर व दिनेश गावडे यांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ दोरीच्या सहाय्याने त्यांचे प्राण वाचविले. त्यामुळे मकानदार कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले. (वार्ताहर)