पोलीस अधीक्षकांचा मंगळवारी गौरव
By Admin | Updated: February 20, 2015 23:09 IST2015-02-20T22:49:34+5:302015-02-20T23:09:58+5:30
बावीस्कर यांनी आपल्या पोलीस सेवेच्या कारकिर्दीत गुणवत्तापूर्वक व विशेष कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना २६ जानेवारी २०१३ रोजी राज्य पोलीस दलाने राष्ट्रपती पुरस्कार जाहीर केला होता.

पोलीस अधीक्षकांचा मंगळवारी गौरव
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र पोलीस दलात गुणवत्तापूर्वक व विशेष कामगिरी बजावणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर यांना मंगळवारी (दि. २४) मुंबई येथील राजभवन येथे राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हे पदक राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.संजयकुमार बावीस्कर यांनी आपल्या पोलीस सेवेच्या कारकिर्दीत गुणवत्तापूर्वक व विशेष कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना २६ जानेवारी २०१३ रोजी राज्य पोलीस दलाने राष्ट्रपती पुरस्कार जाहीर केला होता. एकूण ३९ जणांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. राष्ट्रपती पदकाचे वितरण मंगळवारी रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार आहे. (प्रतिनिधी)