शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांकडून कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 18:55 IST

कुडाळ : मुंबई येथून कोकणकन्या एक्स्प्रेसने कुडाळ येथे आलेल्या व कुडाळ बसस्थानकात मध्यरात्रीपर्यंत उशिरा बसून राहिलेल्या एका वृद्ध महिलेला ...

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांकडून कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप कुडाळात प्रसंगावधान राखत वृद्ध महिलेला सोडले तिच्या माहेरी

कुडाळ : मुंबई येथून कोकणकन्या एक्स्प्रेसने कुडाळ येथे आलेल्या व कुडाळ बसस्थानकात मध्यरात्रीपर्यंत उशिरा बसून राहिलेल्या एका वृद्ध महिलेला कुडाळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई अर्चना कुडाळकर, इतर पोलीस व होमगार्ड यांनी सुरक्षितरित्या तिच्या नातेवाईकांकडे सुपुर्द केले. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार कुडाळ पोलीस ठाण्यात केला.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई येथील सुमन मांडवकर (६१) या वृध्द महिलेचे माहेर बिबवणे येथे असून, बिबवणे येथे येण्यासाठी त्या बुधवारी सकाळी कोकणकन्या एक्स्प्रेसने कुडाळ रेल्वे स्टेशनवर उतरल्या. तिथून त्या कुडाळ बसस्थानकात आल्या. त्यानंतर तिला माहेरी जायचे न समजल्याने ती दिवसभर कुडाळ बसस्थानकात बसून राहिली. त्यानंतर रात्र झाली तरीही ती तिथेच बसून होती.यादरम्यान रात्री पोलीस गस्त घालत असणाऱ्या महिला पोलीस अर्चना कुडाळकर यांनी रात्री १ वाजण्याच्या सुमारास कुडाळ एसटी स्थानकात येऊन पाहणी केली असता, सुमन मांडवकर ही महिला थंडीने कुडकुडत असताना दिसून आली. त्यामुळे ही महिला एकटीच बसून येथे काय करते? तिचे घर कुठे आहे?. तिला मदत मिळावी याकरिता तिच्याकडे जात विचारपूस केली असता, तिने बिबवणे येथे धुरी यांच्याकडे जायचे आहे, एवढेच सांगितले, मात्र तिला नेमकी माहिती देता येत नव्हती. त्यानंतर अर्चना यांनी बिबवणे पोलीस पाटील शैलेश राऊळ यांना संपर्क करीत त्या महिलेचे माहेर गाठले व त्यानंतर तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.प्रसंगावधान ओळखून महिला पोलीस अर्चना कुडाळकर व इतर पोलीस व होमगार्ड यांनी केलेल्या कर्तव्याची माहिती राजेंद्र दाभाडे यांना मिळताच गुरुवारी सकाळी कुडाळ पोलीस ठाणे येथे येत महिला हेड कॉन्स्टेबल अर्चना कुडाळकर, चालक व पोलीस शिपाई एस. डी. कदम, महिला होमगार्ड जना नेरूरकर, होमगार्ड दीपक परब, बिबवणे पोलीस पाटील शैलेश राऊळ या सर्वांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पोलीस निरीक्षक शंकर कोरे उपस्थित होते. 

टॅग्स :Policeपोलिसkudal police stationकुडाळ पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग