शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही; साळगावकरांनी सादर केली कविता अन् म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 16:54 IST

बबन साळगावकर यांनी कवी सुरेश भट यांच्या विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, ही कविता सादर करून सुंदरवाडी कविसंमेलनाला वेगळीच रंगत आणली

सावंतवाडी : विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही म्हणत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भविष्यातील राजकारणाच्या संकेत दिले. निमित्त होते ते कवी केशवसुत यांच्या १५६ व्या जयंती निमित्ताने शहरातील सामाजिक बांधिलकी या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सुंदरवाडी कवी संमेलनाचे. या कवी संमेलनाचे उद्घाटन साळगावकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जी. ए. बुवा, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, साहित्यिक प्रभाकर  भागवत, सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, संजय पेडणेकर, शैलेश नाईक, सतीश बागवे, अशोक पेडणेकर उपस्थितीत होते.बबन साळगावकर यांनी कवी सुरेश भट यांच्या विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, ही कविता सादर करून सुंदरवाडी कविसंमेलनाला वेगळीच रंगत आणली. मात्र आपण सादर केलेल्या कवितेचा वेगळा अर्थ जोडून कृपया कोणीही त्याचा राजकीय विपर्यास करू नये, असेही ते म्हणाले.गझलकार विश्वास यांची कोई दीवाना कहता है, कोई पागल समजता है, धरती की बेचैनी को बस, बादल समजता है. ही गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर संमेलनात उपस्थित असलेले बालकवी पासून नवोदित कवी, युवा कवी व ज्येष्ठ कवीपर्यंत उत्तरोत्तर काव्य मैफल रंगत गेली.यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जी.ए.बुवा यांनी आता कविता करण्याचे दिवस आहेत काय. असे सांगत आपल्या कवितेतून कवींना अंतर्मुख केले. त्यानंतर ज उषा परब, मालवणी कवी दादा मडकईकर, रुपेश पाटील, कल्पना बांदेकर, स्नेहा कदम, विठ्ठल कदम, किशोर वालावलकर, मनोहर परब, सीताराम गावडे, भूषण आरोसकर, मंगल नाईक-जोशी, वाय.पी.नाईक, विनायक गांवस, ऋतुजा सावंत-भोसले, प्रकाश तेंडोलकर, मृण्मयी पोकळे, स्वप्ना गोवेकर, प्रा.ॲड.अरुण पणदुरकर, प्रज्ञा मातोंडकर, बी.जी.बोर्डे, सौम्या गोवेकर, एकनाथ कांबळे, अनिल कांबळे यांच्यासह अनेक कवींनी कविता सादर केल्या.यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी, डॉ. मधुकर घारपुरे, प्रा.केदार म्हसकर, प्रदीप ढोरे, सुधीर धुमे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर आदी उपस्थित होते

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग