युवकाची गळफास लावून आत्महत्या

By Admin | Updated: October 24, 2015 23:24 IST2015-10-24T23:24:27+5:302015-10-24T23:24:27+5:30

तेर्सेबांबर्डे येथील घटना

Suicide by stabbing a youth | युवकाची गळफास लावून आत्महत्या

युवकाची गळफास लावून आत्महत्या

कुडाळ : तेर्सेबांबर्डे येथील ओंकार शिवशंकर मांजरेकर (वय १८) या युवकाने राहत्या घराच्या मागच्या बाजूस झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटे घडली.
तेर्सेबांबर्डे बोरदेसवाडी येथील ओंकार शिवशंकर मांजरेकर या युवकाने शुक्रवारी रात्री गावातील नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धांच्या बक्षीस समारंभ कार्यक्रमाला जातो. मी परत येणार नाही असे घरात सांगून तो निघून गेला. शनिवारी सकाळी त्याच्या घराच्या मागील बाजूच्या कोकमच्या झाडावर दोरी टाकून ओंकारने गळफास लावलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती कुडाळ पोलीस ठाण्यात वासुदेव मेस्त्री यांनी दिली. या आत्महत्येबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून कुडाळ पोलीस एस. एस. पडेलकर यांनी पंचनामा केला व अधिक तपास करीत आहे.
बियर बॉटल व रक्ताचे गुढ ओंकारने केलेल्या आत्महत्येच्या ठिकाणापासून सुमारे २00 मीटर अंतरावरील जंगलमय भागात फुटलेली बियरची बॉटल व रक्ताचे डाग सापडल्याची चर्चा सुरू होती. या गोष्टीचे गुढ मात्र कायम
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide by stabbing a youth