चोरटे सरसावले; पोलीस हतबल

By Admin | Updated: July 2, 2015 00:27 IST2015-07-01T22:50:42+5:302015-07-02T00:27:58+5:30

तपासाचे आव्हान : स्थानिकांच्या समावेशाची शक्यता, राग काढण्याचा प्रकार

Sucker; Police hats | चोरटे सरसावले; पोलीस हतबल

चोरटे सरसावले; पोलीस हतबल

मिलिंद पारकर - कणकवली -शहरातील घरफोड्यांमागील रॉनी गॅँगला जेरबंद केल्यानंतरही शहरातील घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना. एकामागोमाग एक होणाऱ्या घरफोड्यांनी कणकवलीवासीयांसह पोलिसांना हैराण करून सोडले आहे. अपुऱ्या मनुष्यबळासह काम करणाऱ्या पोलीस यंत्रणेला तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. शहरातील घरफोड्यांची पद्धत पाहता स्थानिकांच्या समावेशाची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याबरोबरच अकरा ठिकाणी फ्लॅट फोडून ऐवज चोरीस न जाणे आणि संगणक फोडणे आणि स्टील डीश वाकवून राग काढण्याने पोलीस चक्रावले आहेत. लांगींच्या बदलीने प्रश्नचिन्हशहरातील घरफोड्यांचा यशस्वी तपास करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांची मालवण येथे तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अद्याप कोणी नवीन अधिकारी आलेला नाही. शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून या घरफोड्यांचा तपास होऊन चोरटे जेरबंद होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, सावंतवाडी पाठोपाठ चोरट्यांनी कणकवलीला टार्गेट केल्याचे दिसत आहे.

दोन महिन्यांतील पाचवी घटना
गेल्या दोन महिन्यांतील शहर परिसरातील ही घरफोडीची पाचवी घटना आहे. २७ मे रोजी जानवली येथे बंगला फोडून ५० हजार रोकड लांबविण्यात आली होती. ३१ मे रोजी साईनगर येथील बंगला, १३ जून रोजी महाजनी नगरात पाच बंगले फोडण्यात आले होते. मात्र, या घरफोडीतून ऐवज चोरीस गेलेला नाही.
कुठल्याही वस्तूंना हात लावला नाही
४मंगळवारी रात्री दीड नंतर या घरफोड्या करण्यात आल्या. एकूण अकरा ठिकाणी चोरीचा प्रयत्न करताना चोरट्यांनी फक्त रोकड आणि सोन्याचा शोध घेतल्याचे दिसते. इतर वस्तूंना हात लावलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
चोरट्यांनी राग काढला
४कामत सृष्टीतील दुर्गा कन्स्ट्रक्शनचे कार्यालय फोडून आतील कपाटे विस्कटून चोरट्यांना काहीच हाती लागले नाही. कार्यालयातील संगणकाचा मॉनिटर बाहेर जमिनीवर आपटून फोडण्यात आला.
४बांधकरवाडीतील मनोहर नार्वेकर यांच्या घरातील स्टीलची डीशही वाकवून टाकण्यात आली होती. अकरा ठिकाणी प्रयत्न करूनही काही न मिळाल्याने कदाचित चोरट्यांनी राग काढला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
४बांधकरवाडीतील मनोहर नार्वेकर यांच्या बंद घराबाहेर पोलिसांना देशी दारूची बाटली आढळून आली आहे. घरफोड्या करणाऱ्यांपैकी कोणीतरी ती तेथे टाकली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
४चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये किमान तीन ते चार जणांचा समावेश असावा, असा पोलिसांचा कयास आहे. संकुलांमधील फ्लॅटमध्ये अद्यापही सुरक्षेचे कोणतेही उपाय नसल्याचे दिसून आले.

Web Title: Sucker; Police hats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.