शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यमची भारतीय पोलीस सेवा दलात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:18 IST

sindhudurg, upscexam, educationsector यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारा आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)साठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

ठळक मुद्देआचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यमची भारतीय पोलीस सेवा दलात निवड हैदराबाद येथे जाणार प्रशिक्षणासाठी, सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

आचरा : यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारा आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)साठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.आचरा-चिंदर गावचा सुपुत्र असलेल्या सुब्रमण्यम केळकर याने यूपीएससी परीक्षेत देशस्तरावर ४९७वा क्रमांक मिळवित उज्ज्वल यश संपादन केले होते. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत होते. दरम्यान, सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली असल्याबाबतचा आदेश प्राप्त झाला आहे. तो लवकरच सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे.मालवण तालुक्यातील एका छोट्या गावात राहणारा, लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ््यासमोर ठेवून ध्येय निश्चित करून आपली वाटचाल करणारा आणि घराला आपल्याकडूनही थोडासा आर्थिक हातभार लागावा म्हणून वडिलांसोबत पौरोहित्य करून आर्थिक अडचणींवर मात करीत आपले शिक्षण पूर्ण करणारा सुब्रमण्यम केळकर हा आयपीएस झाला आहे.

आई वडिलांचे आशीर्वाद, अपार मेहनत, प्रचंड कष्ट, राष्ट्रसेवा करण्याचे ध्येय आणि महापुरूषांचा आदर्श या सगळ््याच्या जोरावर सुब्रमण्यम आज इथपर्यंत पोहोचला आहे. पोलीस दलात सुब्रमण्यमसारखे राष्ट्रभक्त युवक जात आहेत. ही सर्व सिंधुदुर्गवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.सुब्रमण्यम आयपीएस झाल्याची बातमी झळकताच सोशल मीडियावरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सुब्रमण्यम याने मालवण तालुक्यातील चिंदरसारख्या ग्रामीण भागात राहून अडचणींना सामोरे जात रात्रीचा दिवस करून हे यश मिळविल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ते मोलाचे ठरले आहे. चिंदरसारख्या ग्रामीण भागात अजूनही धड मोबाईलचे नेटवर्कही व्यवस्थित मिळत नाही. मात्र या सर्वावर सुब्रमण्यमने मात केली आहे.१० ते १२ तास अभ्यास करीत त्याने मिळविले यशसुब्रमण्यम केळकर हा यूपीएससी परीक्षेत भारत देशातून ४९७ वा आला. ही परीक्षा त्याने मराठी माध्यमातून दिली होती. त्याने यूपीएससीसाठी वैकल्पिक विषय हा राजकीय विज्ञान निवडला होता. एका वसतिगृहात राहून त्याने परीक्षेची तयारी केली होती. यासाठी तो पुण्यातील चाणक्य मंडल परिवारमध्ये शिक्षण घेत होता. अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचा अभ्यास त्याने केला होता. १० ते १२ तास अभ्यास करीत त्याने यश संपादन केले होते. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगsindhudurgसिंधुदुर्गEducationशिक्षण