कणकवली : वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी कणकवली येथील सुभाष चंद्रकांत इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुणे, भोर येथील मार्तंड साठे हे आहेत. त्यानी सुभाष इंगळे यांना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र दिले आहे.इंगळे हे गेली काही वर्षे गोंधळाच्या माध्यमातून कुळधर्म, कुलाचाराबरोबरच सामाजिक कार्य करत आहेत. त्याचबरोबर गोंधळ कलेच्या माध्यमातून जनतेचे उद्बोधन, प्रबोधन ते करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात त्यांचा शिष्य परीवार आहे. त्यामुळे लोककलावंतांच्याबाबतच्या त्यांच्या तळमळीला अधिकाधिक बळकटी यावी म्हणून वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने एकमताने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी त्यांची निवड करीत असल्याचे मार्तंड साठे यांनी इंगळे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.दरम्यान, संस्थेचे कोकण प्रदेश अध्यक्ष उत्तम बाबर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सुभाष इंगळे यांचे या निवडीबाबत अभिनंदन केले आहे.
वाघ्या मुरळी परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुभाष इंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 19:23 IST