शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस तालुकाध्यक्षांची तक्रार भोवली; कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद देठेंची तडकाफडकी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 12:07 IST

पोलीस उपनिरीक्षक शरद देठे व अन्य पोलिस अधिकारी या सोशल क्लबच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे सोशल मीडियावर फोटो देखील व्हायरल झाले होते.

कणकवली : कणकवली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी कणकवली पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी वागदे येथील एका सोशल क्लबच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सातत्याने आंदोलन केले. याआंदोलनाची दखल घेत अखेर कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.पोलीस उपनिरीक्षक शरद देठे व अन्य पोलिस अधिकारी या सोशल क्लबच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे सोशल मीडियावर फोटो देखील व्हायरल झाले होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी प्रदीप मांजरेकर यांनी केली होती. याबाबत  मांजरेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही छेडले होते. तसेच त्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, सतेज पाटील यांना देखील मांजरेकर यांनी निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, त्यानंतरही कारवाई होत नसल्याने  मांजरेकर यांनी ओरोस येथे  जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, मांजरेकर यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे अखेर त्यांच्या मागणीची दखल घेत कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांची काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी तालुक्यातील आंबोली दूरक्षेत्राच्या प्रभारी अधिकारी पदावर तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा देठे यांची दहशतवाद विरोधी कक्षात पुढील आदेश होईपर्यंत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सोशल क्लब च्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे पोलीस उपनिरीक्षक देठे यांना भोवल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसcongressकाँग्रेस