शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तारकर्ली स्कुबा सेंटरमध्ये आता अभ्यासाचे धडे ?

By admin | Updated: January 23, 2016 23:45 IST

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असे अभ्यासक्रम तारकर्ली येथे सुरू होणार

मालवण : तारकर्ली येथे उभारणी करण्यात आलेल्या भारतातील एकमेव अशा स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे आता पर्यटनाबरोबर आता अभ्यासक्रमाचेही धडे गिरविले जाणार आहेत. सागरी पर्यटन अभ्यासक्रम, सागरी जीव संशोधन, प्रशिक्षण या विषयावर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरूकरण्याबाबत राज्य शासन विचाराधीन असून, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असे अभ्यासक्रम तारकर्ली येथे सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या पर्यटन महामंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम रूप देण्यात आले आहे. लवकरच स्कुबाच्या अभ्यासक्रमाची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ एकयुटिक स्पोर्टस् (इसदा) चे प्रमुख डॉ. सारंग कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सिंधुदुर्गातील स्कुबा डायव्हिंग जागतिक दर्जाचे बनविताना तारकर्ली स्कुबा डायव्हिंग ही भारताची स्कुबा डायव्हिंग राजधानी बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्तकेला. प्रशिक्षणार्थींचे अर्ज आजपासून उपलब्ध २० तज्ज्ञ स्कुबा डायव्हरची पहिली टीम आगामी तीन महिन्यांच्या कालखंडात प्रशिक्षण देऊन तयार होणार आहे. यासाठी दोन लाख रुपये प्रशिक्षण खर्च आहे; मात्र यापैकी एक लाख रुपये रक्कम युएनडीपी व ५० हजार रुपये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अनुदान स्वरुपात देणार आहे. केवळ ५० हजार या अल्प दरात २० जण प्रशिक्षित म्हणून पर्यटकांच्या सेवेत दाखल होतील. आज, रविवारी ते २८ जानेवारीपर्यंत याबाबतचे अर्ज तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे उपलब्ध असणार आहे व अटी शर्तींची पूर्तता करून २० जण प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी) नवीन स्कुबा ठिकाणांचे संशोधन सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मालवण, देवगड व वेंगुर्ला या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगच्या नवीन ठिकाणांचे संशोधन केले जाणार आहे. देशी-विदेशी पर्यटकांच्या तसेच समुद्री पर्यावरणाच्या सुरक्षेला प्राधान्य देताना प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंग गाईडची टीम बनविण्यात येणार आहे. तारकर्ली स्कुबा डायव्हिंग या ठिकाणी ‘झिरो ते हीरो’ या संकल्पनेखाली २० तज्ज्ञ स्कुबा डायव्हर बनविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. सारंग कुलकर्णी यांनी दिली.