विद्यार्थ्यांनी आयएएस व्हावे
By Admin | Updated: July 13, 2015 00:34 IST2015-07-12T23:10:47+5:302015-07-13T00:34:17+5:30
वैभव नाईक : कुडाळात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

विद्यार्थ्यांनी आयएएस व्हावे
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवून या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आयएएस अधिकारी व्हावे. यासाठी विद्यार्थ्यांकरिता अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी विविध परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी केले.
आमदार वैभव नाईक, व्हिजन करिअर अॅकॅडमी व कुडाळ तालुका युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे दहावी, बारावी व विविध स्पर्धा, परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, महिला उपजिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय भोगटे, द्वारकानाथ घुर्ये, अनुप्रिती खोचरे, पंचायत समिती सदस्य बबन बोभाटे, गंगाराम सडवेलकर, राजू कविटकर, स्रेहा दळवी, सत्यवान कांबळी, दिनकर परब, नागेश नाईक, बाळू पालव, सुप्रिया मांजरेकर व इतर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार नाईक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा नियोजनच्या समितीवर सदस्य म्हणून अभय शिरसाट व संजय गांधी निराधार समितीच्या कुडाळ अध्यक्षपदी संजय पडते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
दहावीच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात प्रथम आलेल्या कुडाळ हायस्कूलचा विद्यार्थी अभय पाटील याचा वारसा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पुढे चालवून शिक्षण क्षेत्रातील जिल्ह्याची यशस्वी परंपरा कायम सुरू ठेवावी, असेही यावेळी आमदार नाईक यांनी सांगितले. कुडाळ येथील गुणवंतांच्या सत्कार समारंभाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
सहकार्य करु
या जिल्ह्यातून आयएएस अधिकारी झाले पाहिजेत. याकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सहज उपलब्ध होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा-परीक्षा कें द्राचा लाभ घ्यावा. यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार नाईक यांनी दिली.