शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली येथील विद्यार्थ्याचा तापाने मृत्यू, आरोग्य प्रशासन सुस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 20:25 IST

सोनुर्ली-गावठणवाडी येथील आठवीत शिकणारा साहिल नामदेव आरोंदेकर (१३) हा शाळकरी विद्यार्थी सावंतवाडी तालुक्यातील तापाचा चौथा बळी ठरला आहे.

 सावंतवाडी - सोनुर्ली-गावठणवाडी येथील आठवीत शिकणारा साहिल नामदेव आरोंदेकर (१३) हा शाळकरी विद्यार्थी सावंतवाडी तालुक्यातील तापाचा चौथा बळी ठरला आहे. त्याचे सोमवारी रात्री उशिरा बांबोळी-गोवा येथे न्यूमोनियासदृश तापाने निधन झाले. दरम्यान, सावंतवाडी रुग्णालयात मंगळवारी नव्याने डेंग्यूचा एक तर तापाचे दोन रुग्ण दाखल झाले आहेत.सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र याची आरोग्य प्रशासन कोणतीही दखल घेताना दिसत नाही. गेल्या पंधरा दिवसांत तालुक्यात तिघांचे बळी गेले होते. यात आंबेगाव येथील संदीप पाटील या विद्यार्थ्याचा तापानेच आकस्मिक मृत्यू झाला होता. मात्र तापाचे निदान अद्याप झाले नाही. तर शहरातील रिक्षा व्यावसायिक पावलू जुआव डिमेलो व मळगाव येथील सतेज गोसावी यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर साहिल याचा सोमवारी रात्री मृत्यू झाल्याने तो चौथा बळी ठरला आहे.साहिल याला आठ दिवसांपासून ताप येत होता. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यातच रविवारी त्याला रक्ताच्या उलट्या झाल्याने अधिक उपचाराकरिता बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले होते. तेथे गेले दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र साहिल हा उपचारांना साथ देत नव्हता. त्यातच त्याचे निधन झाले. त्याच्या रक्ताच्या नमुन्यात न्यूमोनिया तापाची लक्षणे आढळून आली होती. साहिलच्या निधनाचे वृत्त समजताच सोनुर्ली गावावर शोककळा पसरली. साहिल हा हुशार व मनमिळाऊ होता. तो सोनुर्ली हायस्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिक्षण घेत होता. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच त्याला श्रद्धांजली अर्पण करून हायस्कूलला सुटी देण्यात आली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.  डेंग्यूसदृश तापाने निरवडेतील युवती गंभीर सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विचित्र तापाची साथ पसरली आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा निरवडे येथील युवतीला डेंग्यूसदृश ताप येत असल्याचे निष्पन्न झाले. तिला तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती अधिक चिंताजनक बनल्याने तिला बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले आहे. तर दोन बालकांना ताप आल्यामुळे त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साहिलच्या भावालाही तापसाहिलच्या मोठ्या भावालाही काही दिवसांपासून ताप येत आहे. त्याच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने बांबोळी-गोवा येथे उपचार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग