शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सिंधुदुर्गवासीयांना टोलमुक्ती न मिळाल्यास संघर्ष अटळ, कृती समितीचा निर्धार

By सुधीर राणे | Updated: June 13, 2023 15:31 IST

ओसरगाव येथील टोल नाक्यावर उद्या आंदोलन

कणकवली : मुंबई- गोवा महामार्गावर ओसरगाव येथील टोल नाका उद्या बुधवारी (दि.१४) सुरु होणार असल्याची अधिसूचना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व महामार्ग मंत्रालय यांच्याकडून प्रसिद्ध झाली आहे. मात्र, सिंधुदुर्गवासीयांना टोलमुक्ती मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. सिंधुदुर्गात पासिंग झालेल्या सर्व गाड्यांना टोलमुक्ती द्यावी किंवा आम्हाला पर्यायी रस्ता द्यावा. ते शक्य नसल्यास ओसरगाव येथील टोलनाका जिल्ह्याबाहेर हलवावा.  त्यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करु अशी भूमिका टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये यांनी स्पष्ट केली. तसेच उद्या ओसरगाव टोल नाक्यावर समितीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगत सिंधुदुर्गवासीयांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही केले. 

कणकवली येथे टोल मुक्त सिंधुदुर्ग कृती समितीची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर, संजय भोगटे,दीपक बेलवलकर,अनंत पिळणकर, विलास कोरगावकर,दादा कुडतरकर, नितीन म्हापणकर, मठकर,विनायक उर्फ बाळू मेस्त्री,कन्हैया पारकर,प्रमोद मसुरकर, कमलेश नरे, उत्तम राणे,सादिक कुडाळकर, लाड आदी उपस्थित होते. टोल बाबतचा बुद्धिभेद थांबवावा!ओसरगांव टोल नाक्यामुळे जिल्हयाचे विभाजन होत आहे.न्यायालय, प्रशासकीय कार्यालये,  जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय ,वैद्यकीय महाविद्यालय आदीसाठी चार तालुक्यांतील लोकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.  टोल बाबत काही जणाकडून  सातत्याने बुद्धिभेद केला जात आहे. तो थांबवावा. आम्ही टोल माफी नव्हे तर टोल मुक्ती मागत आहोत. जिल्हातर्गत प्रवास करताना टोल नको असे आमचे म्हणणे आहे. याबाबत आतापर्यंत शासन तसेच प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना वारंवार निवेदने, चर्चा केली आहे. आमचा प्रस्ताव, मागणी त्यांच्यासमोर ठेवली आहे. ती मागणी कोणीही झिडकारलेली नाही. उलट सकारात्मकता दाखवत मागणी बाबत विचार सुरु असल्याचेच आम्हाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर टोल बाबतचा निर्णय आम्हाला द्यावा.आम्हाला खिंडीत गाठून अन्यायकारक टोल आकारू नये. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री व इतर लोकप्रतिनिधींनी जनतेला दिलेला शब्द पाळावा. अन्यथा संघर्ष अटळ असून बुधवारी ओसरगाव येथील टोल नाक्यावर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल. प्रशासनाने संघर्ष करायला भाग पाडू नये तसेच आंदोलन चिघळवू नये. या आंदोलनात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही नितीन वाळके यांनी केले. सिंधुदुर्गातील लोकांवर अन्याय का?  सिंधुदुर्ग वासीयांना टोल मुक्ती मिळत नाही तोपर्यंत ओसरगाव येथील टोल नाका आम्ही सुरू होऊ देणार नाही. त्यासाठी कोणतीही भूमिका घ्यावी लागली तरी चालेल असा निर्धार करण्यात आला. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात स्थानिक नागरिकांना टोल मुक्ती देण्यात आली आहे. त्याबाबत आम्ही माहिती संकलित केली आहे. गोव्यातही तेथील लोकांना टोल मुक्ती देण्यात आली आहे. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांवरच फक्त टोल आकारून अन्याय का केला जात आहे? असा सवाल नंदन वेंगुर्लेकर यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाका