शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम राबविणार ! समीर नलावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 12:50 IST

dog, kankavli, muncipaltycarporation, sindhudurgnews कणकवली नगरपंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी आमचे नियोजन आहे . कणकवलीतील भटके कुत्रे पकडणार व त्या कुत्र्यांवर निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, अशी माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

ठळक मुद्देकणकवलीत भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम राबविणार ! समीर नलावडे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही , त्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच करण्यात येईल

कणकवली : कणकवली नगरपंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी आमचे नियोजन आहे . कणकवलीतील भटके कुत्रे पकडणार व त्या कुत्र्यांवर निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, अशी माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभिजित मुसळे, नगरसेवक विराज भोसले, मेघा गांगण, अण्णा कोदे, प्रणाम कोदे, अजय गांगण,किशोर राणे व नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे,सतीश कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी समीर नलावडे म्हणाले, शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे . नगरपंचायत क्षेत्रात वाढलेल्या या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना होत आहे. यावर उपाय योजना करणार आहोत. ५ दिवसात संबधित कामाची निविदा काढली जाईल. तसेच शासनाचे नियम पाळून ही प्रक्रिया होईल.मोकाट भटक्या कुत्र्यांनी निल सावंत याचा चावा घेतला होता . त्याची मुख्याधिकारी यांना माहिती दिली आहे. यांनतर त्यांनी मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाची निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आम्ही काही संस्थाशी संपर्क साधला आहे. त्यापैकी सोसायटी फॉर अँनिमल प्रोटेक्शन नागपूर व अँनिमल फ्रेंड वेलफेअर पब्लिक सोसायटी ठाणे या दोन संस्था आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला आहे. त्या मदत करायला तयार आहेत.नर जातींच्या कुत्र्यांना पकडल्यानंतर ५ दिवसानी व मादी जातीच्या कुत्र्यांना ७ दिवसानंतर टँग लावून सोडण्यात येणार आहे. या प्रक्रियमुळे किमान दोन वर्षात त्यांचा प्रतिसाद दिसेल. या कामासाठी शासनाचा दर असेल त्याप्रमाणे निविदा होईल. कमी दर असेल त्यांना निविदा दिली जाईल. संबधित संस्थेला नगरपंचायतच्यावतीने पाणी,शस्त्रक्रिया करण्यासाठी जागा , लाईट व्यवस्था यांची सोय उपलब्ध करण्यात येईल. भटक्या कुत्र्याची संख्या शहरात ५०० पेक्षा जास्त आहे.त्याचा ही सर्वे लवकरच केला जाईल. तसेच य सर्व प्रक्रियेसाठी आमदार नितेश राणे यांनी आपली जानवली येथील जागा देण्यास तयारी दर्शविली असल्याचेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.मोकाट जनावरांचाही बंदोबस्त करणार !मोकाट जनावरे शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. नरडवे रोडवर ती थांबतात तसेच तेथून ती चरण्यासाठी जातात. ती गुरे शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची वेळीच काळजी घ्यावी. अन्यथा नगरपंचायतीला कारवाई करावी लागेल. असेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :dogकुत्राsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीMuncipal Corporationनगर पालिका