शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: बांदा परिसरात वादळी पावसाचा तडाखा, शासकीय यंत्रणेची वाट न पाहता स्थानिक ग्रामस्थांचे मदत कार्य

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 24, 2024 12:37 IST

बांदा : बांदा परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने काल, गुरुवारी सायंकाळी तडाखा दिला. विलवडे, बांदा शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी ...

बांदा : बांदा परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने काल, गुरुवारी सायंकाळी तडाखा दिला. विलवडे, बांदा शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी रस्त्यावर, वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. काल गुरुवारी सायंकाळी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने वादळी वार्‍यासह शहर व परिसराला झोडपून काढले. बहुतांश ठिकाणी वीज कोसळल्याने वीज उपकरणे निकामी झालीत. वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बांदा शहराला बसला. ज्ञानेश्वर सावंत यांच्या घरावर वडाचे भलेमोठे झाड पडल्याने सावंत यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने सावंत हे कुटुंबियांसह घराच्या बाहेर असल्याने बचावलेत. घराच्या अंगणात असलेली दुचाकी व अॅम्ब्युलन्सचे नुकसान झाले. बांदा सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने ग्रामस्थांनी कोणत्याही शासकीय यंत्रणेची वाट न पाहता धीर देत मदत केली. महाकाय वडाचे झाड कटरच्या साहित्याने बाजूला केला. शहरातील विराज देसाई (गवळीटेम्ब) यांच्या घराचे पत्रे उडून गेले, शंकर आगलावे यांच्या घराच्या छपराचे, उर्मीला उरुमकर यांच्या घरावर काजूचे झाड कोसळून नुकसान झाले. संजय धुरी व फय्याज खतीब यांच्या घरावर वीज कोसळून वायरिंग जळाल्याने नुकसान झाले. विलवडे, नेतर्डे, शेर्ले, डेगवे, वाफोली येथे देखील अनेक घरांचे वादळी पावसाने नुकसान झाले. बांदा शहर व पारिसरात २५ हून अधिक वीज खांब कोसळले. यामुळे शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. गुरुवारी सायंकाळी  सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. ग्रामिण भागात क‍ाही ठिक‍णी वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस