शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीत वादळी पावसामुळे दाणादाण; झाडे कोसळली, वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 13:11 IST

पहिल्याच पावसात वैभववाडी तुंबली

वैभववाडी : वैभववाडी शहर व परिसरात वादळी पावसाने मंगळवारी सायंकाळी दाणादाण उडवून दिली. तालुक्यातील ५० ते ६० इमारतींचे नुकसान तर झालेच. शिवाय शेकडो झाडे उन्मळून पडल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वादळी पावसामुळे तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला. या मान्सूनपूर्व पावसामुळे २५ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.वादळी वाऱ्याने शहरातील अनेक इमारतींंचे छत वाऱ्याने उडून गेले. वैभववाडी, करुळ, खांबाळे, एडगाव, कोकिसरे या गावांमध्ये मोठी पडझड झाली. करूळ जामदारवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. खांबाळे येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने वैभववाडी-फोंडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.वादळामध्ये राजापूर अर्बन बँकेनजीकच्या चार दुकान गाळ्यांवरील पत्र्याचे छप्पर उडाले. यातील एका गाळ्यांमध्ये तालुका खरेदी-विक्री संघाने ठेवलेल्या खताचे नुकसान झाले. याशिवाय साई डिजिटल, समाधान ॲटो गॅरेज, कोल्हापूर इलेक्ट्रिक गॅरेजचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय शहरातील अनेक इमारतींचे पत्रे उडाले आहेत. खांबाळेलाही वादळाचा तडाखा बसला. सावित्री पवार, रामचंद्र साळुंखे, अनंत वासुदेव साळुंखे यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले.संतोष साळुंखे यांच्या कुक्कुटपालन शेडवर झाड कोसळल्याने आतील कोंबड्यांचा मृत्यू झाला.कोकिसरे येथील दिलीप आयरे यांच्या घरांचे पत्रे उडाले आहेत. कोकिसरे दत्तनगरी येथील श्रीरंग पवार आणि इतर चार जणांच्या घरांचे पत्रे उडाले.

आपत्ती व्यवस्थापन बेपत्तावैभववाडी शहरासह तालुक्यातील काही गावांना मंगळवारी दुपारनंतर झालेल्या वादळी पावसाचा तडाखा बसला. करुळसह अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. परंतु पोलिस आणि स्थानिकांनीच वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. शहरात नगरपंचायतीचे कर्मचारी काम करीत होते. परंतु आपत्ती व्यवस्थापनाचा कुठेही मागमूस दिसून आला नाही.

पहिल्याच पावसात वैभववाडी तुंबलीवैभववाडी शहरात जोरदार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात वैभववाडी जागोजागी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. जुने बसस्थानक, संभाजी चौक, दत्त मंदिर परिसरासह ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वैभववाडी तुंबलेली पाहायला मिळाली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस