शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची टीका थांबवा, अन्यथा वस्त्रहरण करावे लागेल!, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

By सुधीर राणे | Updated: December 2, 2023 14:02 IST

कणकवली: भाजप, संघ आणि आमच्या नेत्यांवर संजय राऊत यांनी चुकीच्या पद्धतीने टीका करणे थांबवावे, अन्यथा त्यांच्या घरात जे महाभारत ...

कणकवली: भाजप, संघ आणि आमच्या नेत्यांवर संजय राऊत यांनी चुकीच्या पद्धतीने टीका करणे थांबवावे, अन्यथा त्यांच्या घरात जे महाभारत सुरू आहे ते जगासमोर मांडून त्यांचे वस्त्रहरण करावे लागेल असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला. कणकवली येथील निवासस्थानी प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते. राणे म्हणाले, संजय राऊत यांच्या स्वतःच्या घराची अवस्था, भावाची अवस्था, त्यांच्या घरातील महाभारत आम्ही सांगितले तर काय होईल? याचा विचार त्यांनी करावा. ठाकरे व पवार कुटुंबियांत ज्या काड्या लावल्या त्यामुळे गलिच्छ राजकारण झाले आहे. या सर्वांचा मुख्य सूत्रधार  संजय राऊत हेच आहेत. भगव्याच्या नावाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राजकारण करीत आहेत.संजय राऊत यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपाची होती अशी टीका केली आहे. भाजपाची नीती तालिबान सारखी असल्याचा जावई शोध राऊत यांनी लावला आहे. राऊत हे स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे पायघड्या अंथरून होते. ते झाले नाही म्हणून ठाकरेंच्या सेनेत आणि पवार कुटुंबात त्यांनी काड्या लावल्या, आग लावली असल्याची टीका राणे यांनी केली.मनोज जरांगेना कोणीही अटक करणार नाही. उगाच त्यांचे कान कोण भरत असेल तर ते त्यांनी ऐकू नये. आवश्यकता भासल्यास त्यांची बाजू सरकारकडे मी मांडेन. माझ्या रूपाने तुमचा भाऊ सरकारमध्ये आहे हे जरांगे पाटील यांनी लक्षात ठेवावे. मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून हिंदू समाजात वाद पेटवण्याचे काम काही जिहादी करत आहेत. त्याला आमच्यातील काही फितूर लोक मदत करत आहेत. राम मंदिर मुळे हिंदू एकत्र येतील अशी भीती असल्याने आमच्यातील गद्दारांना एकत्र घेऊन जिहादी वाद निर्माण करत आहेत.असा आरोपही नितेश राणे यावेळी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊत