शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर दगड कोसळून कामगाराचा जागीच मृत्यू, भरावाची माती बाजूला करताना झाला दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 20:11 IST

मालवण : तालुक्यातील हेदूळ येथील डोंगराळ भागात काळ्या दगडाच्या खाणीत काम करीत असताना मातीचा काही भाग कोसळून एका परप्रांतीय खाण कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

मालवण : तालुक्यातील हेदूळ येथील डोंगराळ भागात काळ्या दगडाच्या खाणीत काम करीत असताना मातीचा काही भाग कोसळून एका परप्रांतीय खाण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. डोंगरावरील मातीसहीत एक मोठा दगड अंगावर कोसळल्याने हा अपघात घडला. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. इराण्णा अमरप्पा चव्हाण (५०, रा. मूळ कर्नाटक) असे या कामगाराचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली.हेदूळ येथील दगडाच्या खाणीमध्ये सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास इराण्णा चव्हाण हा अन्य दोन कामगारांसह भरावाची माती बाजूला करत होता. यावेळी डंपर चालक नामदेव परब हे देखील उपस्थित होते. माती भरण्याचे काम सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात अचानक उंच डोंगरावरील एक भलामोठा दगड घरंगळत खाली येत काही क्षणात इराण्णा चव्हाण याच्या अंगावर कोसळला. यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या इराण्णा याला इतर कामगारांनी तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ केली. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.या घटनेबाबत डंपर चालक नामदेव परब याने कट्टा पोलीस दूरक्षेत्राला तसेच खाण चालक अमरसेन सावंत यांना मोबाईलवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. कट्टा पोलीस दूरक्षेत्राचे उत्तम आंबेरकर, स्वप्नील तांबे, योगेश सराफदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत दशरथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मृत इराण्णा चव्हाण हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी कर्नाटकहून इराण्णा याचे नातेवाईक आल्यानंतर त्याचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. तर इराण्णा याच्या कुटुंबीयांना विमा रक्कम त्याचबरोबर रोख स्वरूपात मदत केली जाणार असल्याचे खाण चालक सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग