शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत : दीक्षित गेडाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 17:21 IST

वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याखाली सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाला बालकल्याण समिती, उमरखडी डोंगरी-मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेला ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच वेंगुर्ले वेतोबा मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

ठळक मुद्देचोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत : दीक्षित गेडामआरवलीतील दानपेटी चोरीप्रकरणी तपास सुरू

सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याखाली सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाला बालकल्याण समिती, उमरखडी डोंगरी-मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेला ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच वेंगुर्ले वेतोबा मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.वेंगुर्ले येथे मोबाईल शॉपीमध्ये चोरी झाली होती. यात मोबाईल, चार्जर, पॉवर बँक, रोख रक्कम आदींवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आपली तपासाच्या दिशेने कार्यवाही सुरू केली होती.

दरम्यान या चोरी प्रकरणी एलसीबीच्या पथकाने उत्तरप्रदेश येथील १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाला बालकल्याण समिती उमरखडी डोंगरी-मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेले ६ मोबाईल, ४ मोबाईल चार्जर, ५ चार्जर कार्ड, ३ पॉवर बँक, १ हेडफोन, १ ब्ल्यूटुथ हेडफोन, १ ब्ल्यूटुथ स्पीकर, ३ जुनी मनगटी घड्याळे, ७ पॉवर बँक कनेक्टर आणि १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.तसेच ६ जुलै रोजी वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्री वेतोबा मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारत ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात चोरी प्रकरणात विधीसंघर्ष बालक सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याने संबंधित बालकाची दानपेटी चोरीप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती दीक्षित गेडाम यांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग