शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे सोने घेतले, कणकवलीतील सुवर्णकारासह अन्य एकाला बेळगाव पोलिसांची नोटीस

By सुधीर राणे | Updated: July 28, 2023 15:48 IST

शहरातील सुवर्णकार तसेच व्यापाऱ्यांनी व्यक्त केला संताप

कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे येथे शस्त्रांसह पकडण्यात आलेल्या प्रकाश विनायक पाटील (३८, रा. गोवा) या चोरट्याने बेळगावसह कर्नाटक राज्यात विविध ठिकाणी घरफोडी करून चोरून आणलेले सोने कणकवलीतील दोन सुवर्ण पेढ्यांवर विकले होते. अशी माहिती त्याने बेळगावपोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक किरण होणाकट्टी यांच्यासह बेळगाव पोलिसांचे पथक गुरुवारी कणकवलीत दाखल झाले. त्या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार एका सुवर्णकारांसह सोने वितळविणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरातील सुवर्णकार तसेच व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.दरम्यान, बेळगाव पोलिसांनी त्या सुवर्णकारासह सोने वितळविण्याचे काम करणाऱ्या त्या व्यक्तीला चौकशीसाठी तसेच त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी शुक्रवारी बेळगाव पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस दिली आहे. कर्नाटक पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने सुवर्णकारांवर कारवाई केली, असे सांगत गुरुवारी दुपारी सुवर्णकार संघटना पदाधिकारी तसेच  भाजप पदाधिकाऱ्यांनी कणकवली पोलिस ठाणे गाठले. त्यामुळे पोलिस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे कणकवलीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चोरीप्रकरणी लांजा पोलिसांनी प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले होते. तेथून बेळगाव पोलिसांनी पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर चोरी केलेले सोने आपण कणकवलीतील दोन सुवर्ण पेढ्यावर विकले असल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे अधिक चौकशीकरिता गुरुवारी सकाळी बेळगाव पोलिस कणकवलीत दाखल झाले.शहरातील परमहंस भालचंद्र महाराज आश्रमात संबधित सुवर्णकार आरती करण्याकरता थांबलेले असताना संशयीत आरोपीने दिलेल्या माहितीनुसार संबंधित सुवर्णकाराला बेळगाव पोलिसांनी थेट आरोपी सारखी वागणूक देत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. असा आरोप सुवर्णकाराने केला. दरम्यान त्या सुवर्णकाराला घेऊन कर्नाटक पोलिस कणकवली पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाले. यावेळी कणकवलीतील सुवर्णकार संघटना पदाधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यासह कणकवलीतील अनेक नागरिकांनी पोलिस ठाण्यामध्ये धाव घेतली.चोरट्याच्या फक्त सांगण्यावरून सुवर्ण पेढी व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका. तपासात निष्पन्न झाल्यास कारवाई करा. चोरटा सांगतो म्हणून धरपकड करून व्यापाऱ्यांची बदनामी करू नका, अशा प्रकारचे म्हणणे  व्यापारी संघटना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसमोर मांडले. आरोपी सांगत असलेल्या सराफी व्यापाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देऊ, त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडावे, त्यांना अटक केली जाणार नाही, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर कणकवली पोलिस ठाण्यात निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण निवळले. त्यानंतर त्या सुवर्णकारासह सोने वितळविणाऱ्या कारागिरास त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी तसेच अधिक चौकशीसाठी बेळगाव पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची चर्चा कणकवलीसह जिल्ह्यात रंगली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbelgaonबेळगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी