शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला कणकवलीत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 17:15 IST

Kankavli dogNews- कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. त्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आपण पुढाकार घेऊन शहरात मोहीम राबविली होती. मात्र, दुर्दैवाने त्या मोहिमेतील डॉक्टरांनीच माघार घेतली. भटक्या कुत्र्यांचा त्रास हा शहरापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातही तेवढाच आहे.

ठळक मुद्देभटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला कणकवलीत प्रारंभनगरपंचायतीचा पुढाकार, जिल्ह्यासाठीचा उपक्रम

कणकवली : कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. त्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आपण पुढाकार घेऊन शहरात मोहीम राबविली होती. मात्र, दुर्दैवाने त्या मोहिमेतील डॉक्टरांनीच माघार घेतली. भटक्या कुत्र्यांचा त्रास हा शहरापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातही तेवढाच आहे.

आपल्या संस्थेद्वारे जिल्ह्यासाठी हा उपक्रम राबवून आपण भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. त्यासाठीची सर्वतोपरी मदत आपण करू, अशी ग्वाही आमदार नीतेश राणे यांनी दिली.

कणकवली नगरपंचायत कणकवली सर्वेक्षण २०२१ आणि सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (सॅप) कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व अँटी रेबीज लसीकरण मोहिमेचा प्रारंभ आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बांधकाम सभापती मेघा गांगण, नगरसेवक अभिजीत मुसळे, संजय कामतेकर, विराज भोसले, कविता राणे, बंडू गांगण, महेश सावंत, नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे, पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राहुल बेंबाटकर, संस्थेचे समन्वयक सचिन देऊलकर, व्यवस्थापक विजय पाटील तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.कणकवली शहरात भटक्या कुत्र्याने ९ वर्षांच्या बालकाचा चावा घेतला होता. त्यावेळी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतला. इतर नगरसेवकांनी त्याला पाठिंबा दिला. त्याची सुरुवात सोमवारी सकाळपासून करण्यात आली. कार्यारंभ आदेश देऊन हे काम सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. त्या संस्थेच्या सदस्यांचे अभिनंदन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.तसेच या उपक्रमास आवश्यक असलेल्या सेंटरसाठी आमदार नीतेश राणे यांनी हॉटेल नीलम्स कंट्रीसाईडच्या नजीक जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानले.विशिष्ट तंत्राचा वापर करून कुत्र्यांना पकडणारसचिन देऊलकर म्हणाले, आमच्या कामाची सुरुवात दररोज सकाळी ५.३० वाजल्यापासून होईल. यात कुत्र्यांना जाळ्यांचा तसेच आमच्या विशिष्ट तंत्राचा वापर करून पकडले जाईल. कुत्र्यांना ताब्यात घेतल्यानंतर एक नंबर दिला जाईल. तो नंबर कुत्र्याच्या कानावरही लिहिला जाईल.

पुढे केंद्रावर आणून लसीकरण वगैरे प्रक्रिया करून नंतर नसबंदी केली जाईल. या सर्व प्रक्रिया तीन दिवसांमध्ये केल्या जातील. त्यानंतर या कुत्र्याला जेथून ताब्यात घेतले, त्याच ठिकाणी आणून सोडले जाईल. नसबंदी झाल्यामुळे नव्याने पिल्ले जन्माला येणे बंद होईल. 

टॅग्स :dogकुत्राsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली