भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला कणकवलीत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 05:10 PM2021-01-06T17:10:50+5:302021-01-06T17:15:09+5:30

Kankavli dogNews- कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. त्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आपण पुढाकार घेऊन शहरात मोहीम राबविली होती. मात्र, दुर्दैवाने त्या मोहिमेतील डॉक्टरांनीच माघार घेतली. भटक्या कुत्र्यांचा त्रास हा शहरापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातही तेवढाच आहे.

Sterilization campaign of stray dogs started in Kankavali | भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला कणकवलीत प्रारंभ

कणकवली नगरपंचायतीच्यावतीने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेचा आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते. (अनिकेत उचले)

Next
ठळक मुद्देभटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला कणकवलीत प्रारंभनगरपंचायतीचा पुढाकार, जिल्ह्यासाठीचा उपक्रम

कणकवली : कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. त्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आपण पुढाकार घेऊन शहरात मोहीम राबविली होती. मात्र, दुर्दैवाने त्या मोहिमेतील डॉक्टरांनीच माघार घेतली. भटक्या कुत्र्यांचा त्रास हा शहरापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातही तेवढाच आहे.

आपल्या संस्थेद्वारे जिल्ह्यासाठी हा उपक्रम राबवून आपण भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. त्यासाठीची सर्वतोपरी मदत आपण करू, अशी ग्वाही आमदार नीतेश राणे यांनी दिली.

कणकवली नगरपंचायत कणकवली सर्वेक्षण २०२१ आणि सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (सॅप) कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व अँटी रेबीज लसीकरण मोहिमेचा प्रारंभ आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बांधकाम सभापती मेघा गांगण, नगरसेवक अभिजीत मुसळे, संजय कामतेकर, विराज भोसले, कविता राणे, बंडू गांगण, महेश सावंत, नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे, पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राहुल बेंबाटकर, संस्थेचे समन्वयक सचिन देऊलकर, व्यवस्थापक विजय पाटील तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.

कणकवली शहरात भटक्या कुत्र्याने ९ वर्षांच्या बालकाचा चावा घेतला होता. त्यावेळी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतला. इतर नगरसेवकांनी त्याला पाठिंबा दिला. त्याची सुरुवात सोमवारी सकाळपासून करण्यात आली. कार्यारंभ आदेश देऊन हे काम सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. त्या संस्थेच्या सदस्यांचे अभिनंदन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.

तसेच या उपक्रमास आवश्यक असलेल्या सेंटरसाठी आमदार नीतेश राणे यांनी हॉटेल नीलम्स कंट्रीसाईडच्या नजीक जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

विशिष्ट तंत्राचा वापर करून कुत्र्यांना पकडणार

सचिन देऊलकर म्हणाले, आमच्या कामाची सुरुवात दररोज सकाळी ५.३० वाजल्यापासून होईल. यात कुत्र्यांना जाळ्यांचा तसेच आमच्या विशिष्ट तंत्राचा वापर करून पकडले जाईल. कुत्र्यांना ताब्यात घेतल्यानंतर एक नंबर दिला जाईल. तो नंबर कुत्र्याच्या कानावरही लिहिला जाईल.

पुढे केंद्रावर आणून लसीकरण वगैरे प्रक्रिया करून नंतर नसबंदी केली जाईल. या सर्व प्रक्रिया तीन दिवसांमध्ये केल्या जातील. त्यानंतर या कुत्र्याला जेथून ताब्यात घेतले, त्याच ठिकाणी आणून सोडले जाईल. नसबंदी झाल्यामुळे नव्याने पिल्ले जन्माला येणे बंद होईल.



 

Web Title: Sterilization campaign of stray dogs started in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.