आवळेगावात राज्य-जिल्हास्तरीय स्पर्धा
By Admin | Updated: March 18, 2017 21:00 IST2017-03-18T21:00:42+5:302017-03-18T21:00:42+5:30
कदम फाऊंडेशन व ‘शब्दवेल’तर्फे आयोजन : १४ एप्रिलपासून होणार सुरुवात

आवळेगावात राज्य-जिल्हास्तरीय स्पर्धा
कडावल : आवळेगाव येथे १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत विविध जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मोफत आरोग्य शिबिर व जिल्ह्यातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन सतीश कदम फाऊंडेशन व शब्दवेल प्रकाशनतर्फे करण्यात आले असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.शुक्रवार १४ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम क्रमांक ३००० रुपये, द्वितीय क्रमांक २००० रुपये व तृतीय क्रमांकास १००० रुपये पारितोषिक आहे. तसेच उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार आहेत.शनिवार २२ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्या प्रथम क्रमांकास ७००० रुपये, द्वितीय क्रमांकास ५००० रुपये, तृतीय क्रमांकास ३००० रुपये तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे व प्रत्येकी चषक देण्यात येणार आहे. शनिवार ३० एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा होणार आहे. विजेत्या स्पर्धकांस प्रथम क्रमांकास ७००० रुपये, द्वितीय क्रमांकास ५००० रुपये व तृतीय क्रमांकास ३००० रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार आहेत. सोमवार १ मे २०१७ रोजी रात्री ९.३० वाजता जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या प्रथम क्रमांकास ३००० रुपये, द्वितीय क्रमांकास २००० रुपये व तृतीय क्रमांकास १००० रुपये व चषक देण्यात येणार असून इतरही उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच देणगीच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन आयोजक सतीश कदम यांनी केले
आहे. (वार्ताहर)
विशेषांकाचे प्रकाशन
या कार्यक्रमांतर्गत पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार असून यावेळी ‘सिंधुसाफल्य’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.