शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सोनवडे घाट मार्ग काम सुरु करा ; अन्यथा 11 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 13:46 IST

जनतेच्या हिताच्या दृष्टिने महत्वपूर्ण असलेल्या सोनवडे घाट मार्गाचे प्रत्यक्ष काम 31 जानेवारी पर्यन्त सुरु करण्यात यावे. तसे न झाल्यास 11फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा महामार्गावर पणदुर फाटा येथे सोनवडे घाट मार्ग संघर्ष समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल . असे निवेदन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यासाठी प्रांताधिकारी नीता शिंदे-सावंत यांच्याकडे गुरुवारी सुपुर्द करण्यात आले.

ठळक मुद्देसोनवडे घाट मार्ग काम सुरु करा ; अन्यथा 11 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलनप्रांताधिकाऱ्याकडे निवेदन सुपुर्द

कणकवली : जनतेच्या हिताच्या दृष्टिने महत्वपूर्ण असलेल्या सोनवडे घाट मार्गाचे प्रत्यक्ष काम 31 जानेवारी पर्यन्त सुरु करण्यात यावे. तसे न झाल्यास 11फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा महामार्गावर पणदुर फाटा येथे सोनवडे घाट मार्ग संघर्ष समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यासाठी प्रांताधिकारी नीता शिंदे-सावंत यांच्याकडे गुरुवारी सुपुर्द करण्यात आले.सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली येथील कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सोनवडे सरपंच उत्तम बांदेकर, संतोष पवार , सत्यवान ढवळ, दाजी तवटे, विलास ढवळ, वासुदेव सावंत, सखाराम मेस्त्री , भगवान शिंदे, सखाराम शिंदे, चंद्रकांत रेडकर आदी उपस्थित होते.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापुरला जाण्यासाठी फोंडा, करुळ, भुईबावडा, आंबोली, आंबा आदी घाट मार्ग आहेत. परंतु हे घाटमार्ग दुर्गम आहेत. त्यांची लांबी 10 ते 15 किलोमीटर्स आहे. तसेच उंचीही जास्त आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून याठिकाणी अनेकवेळा अपघात होत असतात. या पार्श्वभूमिवर सोनवडे घाट मार्गाचा विचार केल्यास त्याची लांबी सहा ते सात किलोमीटर आहे. वळणेही कमी आहेत. तसेच ऊँची कमी असून सर्वात सुरक्षित असा हा घाट मार्ग आहे.कोल्हापुरचे अंतर सुमारे 40 किलोमीटर्सने कमी होते. त्यामुळे इंधन व वेळेची बचत होते. हा घाटमार्ग व्हावा यासाठी आम्ही अनेकवेळा मागणी केली असून विविध आंदोलने केली आहेत. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून 31 मे 2018 रोजी सोनवडे घाट मार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करण्यासाठी कोल्हापुर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो ग्रामस्थ जमले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी लेखी पत्र देवून जानेवारी 2019 मध्ये प्रत्यक्ष घाटमार्गाच्या कामाला सुरुवात करतो असे लेखी आश्वासन दिले होते.त्यामुळे आम्ही आत्मदहन आंदोलन थांबविले होते. महसुलमंत्र्यानी डिसेंबर मध्ये या कामाची निविदा काढली जाईल असे सांगितले होते. परंतु तसे काहीही अद्याप झालेले नाही . त्यामुळे 31 जानेवारी पर्यन्त प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.असेही या निवेदनात म्हटले आहे.शासन चालढकलपणा करीत आहे!फोण्डाघाट मार्ग अभयारण्यातून जात आहे. त्याला शासनाचा विरोध नाही.परंतु सोनवडे घाट मार्ग त्या अभयारण्यापासून दहा किलोमीटरवरुन जात आहे. तो मार्ग करण्यास शासन चालढकलपणा करीत आहे.असे का? असा प्रश्नही या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकsindhudurgसिंधुदुर्ग