शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

पर्यटन महोत्सवाला शोभायात्रेने प्रारंभ

By admin | Updated: May 7, 2016 00:54 IST

चिपळूण नगरीचा प्रतिसाद : पालकमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

चिपळूण : भगवान परशुरामांची भूमी, जगप्रसिद्ध हापूस आंब्याची भूमी, एकीकडे अफाट समुद्र आणि दुसरीकडे सह्याद्रीचा कडा लाभलेली भूमी अशी अनेकविध वैशिष्ट्ये लाभलेल्या कोकणभूमीतील चिपळूणमध्ये रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६ चा दिमाखदार सोहळा शुक्रवारपासून शोभायात्रेने सुरू झाला. पालकमंत्री रवींद्र वायकर, समिती अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण, सभापती स्नेहा मेस्त्री, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांची उपस्थिती लाभलेल्या या शोभायात्रेचे नेतृत्त्व तहसीलदार वृषाली पाटील यांनी केले.ढोल, ताशे, नगारे, लेझीम, खालुबाजा, नाशिकबाजा, झांजपथकाच्या गजरात शोभायात्रेला प्रारंभ झाला. आकर्षक वेषभूषा केलेले नागरिक, विविध चित्ररथ विशेष लक्षवेधी ठरत होते. शोभायात्रा नगर परिषदेजवळ आली असता करंजेश्वरीच्या पालख्या वर उचलण्यात आल्या. येथे पुष्पवृष्टी करण्यात आली. शोभायात्रेच्या पुढे रांगोळीच्या नेत्रदीपक पायघड्या घातल्या जात होत्या. सनई चौघड्याचे मंजूळ सूर घुमत होते. डीबीजे महाविद्यालयाची कलाकार टीम आपले पथनाट्य सादर करून जनजागृती करत होती. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, नगर परिषद, बाजारपेठमार्गे नाथ पै चौकातून वडनाका, भैरी मंदिरकडून शोभायात्रा पुन्हा पवन तलाव मैदान येथे महोत्सव स्थळी येऊन विसर्जित झाली. या शोभायात्रेत मुस्लीम समाजाची कोकण सिरत समिती प्रथमच सहभागी झाली होती. त्यांनी रातिब व खालुबाजा सादर केला. शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्राण्यांचे वेश परिधान करून वन्य प्राण्यांचे रक्षण करा हा संदेश दिला. याशिवाय परांजपे हायस्कूल, युनायटेड इंग्लिश स्कूल, दलवाई हायस्कूल, पेढे हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, बांदल हायस्कूल, खेर्डी सती हायस्कूल, सावर्डे हायस्कूल यांचे लेझीम व झांजपथक सहभागी झाले होते. पाग महिला विद्यालयाच्या विद्यार्थिनी विविधरंगी पोशाख घालून सहभागी झाल्या होत्या. विघ्नहर्ता ग्रुपचे नाशिक ढोल व झांजपथक लक्षवेधी ठरले. शंकरवाडी झांजपथकाने थरारक दृश्य सादर केले. जुना कालभैरी रंगमंचतर्फे ७ विविध चित्ररथ सहभागी झाले हाते. या शोभायात्रेत करंजेश्वरी देवीची पालखी ही पारंपरिक पद्धतीने सहभागी झाली होती. (प्रतिनिधी)