माजगावात एकांकिका स्पर्धेला प्रारंभ

By Admin | Updated: January 13, 2015 00:15 IST2015-01-12T21:40:07+5:302015-01-13T00:15:30+5:30

गुरुनाथ पेडणेकर : नाट्य कलेतून समाजप्रबोधन व्हावे

Start of one-liner competition in Majgaon | माजगावात एकांकिका स्पर्धेला प्रारंभ

माजगावात एकांकिका स्पर्धेला प्रारंभ

सावंतवाडी : समाज प्रबोधनासाठी नाट्यकलेचा वापर होणे गरजेचे आहे. एकांकिका स्पर्धेचे सद्गुरु मंडळाचे चौदावे वर्ष असून एखादी परंपरा पुढे सरू ठेवण्याचा वारसा हे मंडळ चालवत आहे, हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक कलाकारांनाही विविध चांगल्या कलाकृती पाहण्याचा व आपली कला सादर करण्यास वाव मिळत आहे, असे प्रतिपादन शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी केले.सद्गुरू कृपा मित्र परिवार, माजगाव या मंडळाच्यावतीने आयोजित खुल्या एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर तसेच भारत सरकारची दक्षता गुण नियंत्रण समिती सदस्य विकास सावंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात आयोजित ही स्पर्धा तीन दिवस सुरू आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एच. बी. सावंत, माजगाव शिक्षण सहायक संस्थेचे सचिव लक्ष्मण नाईक, सामाजिक कार्यकर्ते अजित वारंग, मूर्ती कासार, विलास परांजपे, हर्षवर्धन धारणकर, इन्सुली शाळेचे मुख्याध्यापक लहूराम गावडे व परीक्षक उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष भास्कर कासार यांनी स्वागत केले. जगदीश सावंत यांनी सूत्रसंचालन, तर संजय सावंत यांनी आभार मानले. यावेळी विजय सावंत, विठ्ठल सावंत, अरविंद रेडकर, हेमंत गाड, रवींद्र कानसे, उमेश सावंत, कांतू सावंत, प्रशांत मोरजकर व मंडळाचे सदस्य, सभासद, माजगाव हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माजगावचे सरपंच आबा सावंत या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांनी पत्राद्वारे आपल्या शुभेच्छा पाठविल्या. यावेळी सन २०१४ मध्ये दहावी परीक्षेमधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा, मुख्याध्यापक एच. बी. सावंत, प्रमोद सावंत, अजय सावंत व अनिल भिसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Start of one-liner competition in Majgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.