तळेरेत संपर्क कार्यालयाचा प्रारंभ
By Admin | Updated: March 23, 2015 00:41 IST2015-03-22T22:28:07+5:302015-03-23T00:41:09+5:30
कृती समितीचा पुढाकार : थाटात उद्घाटन; गावातील सूचना, पत्रव्यवहार होणार

तळेरेत संपर्क कार्यालयाचा प्रारंभ
नांदगांव : तळेरे येथील नियोजित तळेरे तालुका कृती समितीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी तळेरे येथील ज्येष्ठ नागरिक रमाकांत वरुणकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत नियोजित तळेरे तालुका कृती समितीची निवड करण्यात आली होती. तळेरे बाजारपेठेत प्रवीण वरुणकर यांच्या घरी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी तळेरे सरपंच दर्शना बांदिवडेकर, उपसरपंच शशांक तळेकर, निवृत्त पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, कृती समिती अध्यक्ष बापू डंबे, कायदेविषयक सल्लागार अॅड. प्रसाद करंदीकर, पोंभुर्ले सरपंच सादिक डोंगरकर, दत्तात्रय कल्याणकर, दिलीप तळेकर, राजू जठार, पोलीस पाटील चंद्रकांत चव्हाण, उदय दुधवडकर, प्रसाद कल्याणकर, उल्हास कल्याणकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, शरद वायंगणकर, प्रवीण वरुणकर, बी. पी. साळीस्तेकर, सतीश चेंदवणकर उपस्थित होते. नियोजित तळेरे तालुका होण्याबाबत आवश्यक ती माहिती अथवा नियोजित तळेरे तालुक्यामध्ये येणाऱ्या गावांबद्दल असणाऱ्या सूचना वपत्रव्यवहार या कार्यालयामार्फत होणार असून, बाजारात असल्यामुळे सर्वानाच सोयीचे होईल.तळेरे तालुका व्हावा अशी अनेक ग्रामीण भागातील ग्रामस्थांची मागणी असून, त्यासाठी विशेष प्रयत्न या समितीमार्फत करण्यात येणार आहेत. या कामासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय स्तरावरही विशेषत्वाने प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रयत्नांना अधिक बळकटी येण्यासाठी सध्याच्या अस्तित्वात असलेल्या कणकवली व देवगड तालुक्याच्या ठिकाणी जायला वेळ जातो. शिवाय आर्थिक, मानसिक मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा गावांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन नियोजित तळेरे तालुका कृती समितीच्यावतीने करण्यात आले.यावेळी मोहन भोगले, राजेश माळवदे, राजकुमार तळेकर, उद्योगपती शांतिनाथ लडगे, नरेश वरुणकर, नीलेश तळेकर, विश्वजित तळेकर, चंद्रकांत चव्हाण, मनोज तळेकर, विजय पावसकर, मारुती वळंजू, दादासाहेब महाडिक, उद्योगपती गोपाळ बांदिवडेकर, नामदेव पाताडे, डॉ. अभिनंदन मालंडकर, संतोष जठार, आप्पा मेस्त्री यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तळेरेसह इतर गावातील ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिकांनी तळेरे तालुका लवकरात लवकर व्हावा व ग्रामीण जनतेचे हाल कमी
व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. (वार्ताहर)
सूचनावहीत नोंद करावी
याठिकाणी सूचनावही ठेवण्यात आली असून, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांनी नियोजित तळेरे तालुक्याबाबतच्या सूचना नोंद कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. आवश्यक त्या सूचना विचारात घेतल्या जातील. तसेच तळेरे तालुक्याच्या दृष्टिकोनातून नवीन काही सुचवायचे असेल तरीदेखील त्याचे स्वागत केले जाईल असे कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले.