शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली बसस्थानकात एसटी कामगारांची निदर्शने; प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष

By सुधीर राणे | Updated: March 5, 2025 16:42 IST

कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन व एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार ...

कणकवली: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन व एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी कणकवली बसस्थानकात निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व एसटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कामगार नेते दिलीप साटम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विनय राणे, अनिल नर, उमेश बोभाटे, नंदू घाडी, प्रकाश वालावलकर, गुरू सामंत, बाबा इस्वलकर, राठवड यांच्यासह एसटी आगारातील बहुसंख्य कामगार उपस्थित होते. संघटनेने राज्य शासन व एसटी प्रशासन यांना निवेदन देवून विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील कामगारांची थकबाकी त्वरित अदा करावी, २०१८ ची महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा न्यायालयाच्या आदेशाचे त्वरित अंमलबजावणी करावी, सन २०१६ ते २०२०या कालावधीत एकतर्फी जाहीर केलेली वेतन वाढ यातील मान्य केल्याप्रमाणे घरभाडे भत्त्याचा दर ८,१६,२४ टक्के करून थकबाकी त्वरित अदा करावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन कामगारांचा महागाई भत्ता ५३ टक्के करुन थकबाकीसह त्वरित द्यावा यासह अशा विविध मागण्या असून त्याची पूर्तता होण्यासाठी यावेळी लक्ष वेधण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीagitationआंदोलन