शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचारी प्रश्न : आश्वासनानंतर आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:43 IST

state transport,Sindhududurgnews, bjp मुंबईत सेवा देण्यासाठी जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता? आता कर्मचाऱ्यांना तिकडे पाठवू नका. एकाच कर्मचाऱ्याला वेठीस का धरता ? असे प्रश्न विचारत यासह अनेक मुद्यांवर एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले.

ठळक मुद्दे एसटी कर्मचारी प्रश्न : आश्वासनानंतर आंदोलन मागे विभाग नियंत्रकांना भाजपाचा घेराव

कणकवली : मुंबईत सेवा देण्यासाठी जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता? आता कर्मचाऱ्यांना तिकडे पाठवू नका. एकाच कर्मचाऱ्याला वेठीस का धरता ? असे प्रश्न विचारत यासह अनेक मुद्यांवर एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले.त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना फक्त ८ दिवस ड्युटी राहील. कर्मचाऱ्यांना सगळ्या सुविधा दिल्या जातील. ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना मुबंईत सेवा देण्यासाठी पाठविले जाणार नाही. ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या सुरळीत केल्या जातील, असे आश्वासन रसाळ यांनी दिले. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.कणकवली बसस्थानक येथे मुंबईत जाणाऱ्या एसटी रोखल्यानंतर विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ तिथे दाखल झाले. काही शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर कणकवली आगारप्रमुख यांच्या दालनात चर्चा झाली. या चर्चेत आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मोबाईलवरून आमदार नीतेश राणे यांनी विभाग नियंत्रक रसाळ यांच्याशी चर्चा केली. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, सभापती दिलीप तळेकर, उपाध्यक्ष सोनू सावंत, सरचिटणीस महेश गुरव, संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सचिन परधिये, संदीप सावंत, विजय कदम, अनिल घाडीगांवकर आदी उपस्थित होते.सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक द्यावीएसटी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने मुंबईला सेवा देण्यासाठी पाठविले जाते. तिथे कोविडबाबत कोणत्याही प्रकारची सुविधा पुरविली जात नाही. एकाच कर्मचाऱ्याला दोन ते तीन वेळा पाठविले जा. तर काहींना एकदाही मुंबईला पाठविले गेले नाही. त्यामुळे सर्वांनाच समान वागणूक द्यावी, अशा विविध मागण्या मांडून भाजप पदाधिकाऱ्यांनी रसाळ यांना घेराव घातला. 

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा