एस.टी.ने ठोकरल्याने वृद्धा ठार
By Admin | Updated: July 17, 2014 23:09 IST2014-07-17T23:07:38+5:302014-07-17T23:09:53+5:30
दुसरी महिला गंभीर : पोईप येथील घटना; चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

एस.टी.ने ठोकरल्याने वृद्धा ठार
चौके : मालवण आगारातून असगणीमार्गे कणकवलीला जाणाऱ्या एस.टी. बसच्या चालकाला पोईप येथील रस्त्यावरील दाजी भोरजी या वळणाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात चंद्रकला दरबाईलाल ठाकूर (वय ५५, मूळ रा. डांगमोडे ठाकूरवाडी) यांचा मृत्यू झाला.
ज्युजेमीन मोगेश लोबो (४५, रा. पोईप विरणवाडी) यांना जबर मार बसला असून, त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. आज, गुरुवारी सकाळी दहा वाजता हा अपघात झाला.
कणकवली आगारातील चालक महेश जयवंत घाडीगावकर (रा. हरकुळ) हे आपल्या ताब्यातील एम.एच. २०, बीएल २४४३ ही एस.टी.बस घेऊन मालवण आगारातून असगणीमार्गे कणकवली आगारात निघाले होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोईप गावातून जाणाऱ्या रस्त्यावरील दाजी भोरजी वळणावर विरुद्ध दिशेने गटाराच्या कडेला असलेल्या झाडाला बस ठोकरली.