शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी-दुचाकीची धडक; दोघे युवक जखमी, खारेपाटणजवळील घटना : दुचाकीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:50 IST

दुचाकी चालकाला समोरुन येणाऱ्या एसटीचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात खारेपाटण येथील यशवंत सुहास फाटक (२१) व तुषार सुहास फाटक (१९) हे दोन युवक जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी २.४५ वाजता खारेपाटण-मुटाट रस्त्यावर घडला.

ठळक मुद्देएसटी-दुचाकीची धडक; दोघे युवक जखमीखारेपाटणजवळील घटना : दुचाकीचे नुकसान

खारेपाटण : खारेपाटण एसटी आगारातून दुपारी सुटलेली कणकवली आगाराची खारेपाटण-मणचे गाडी मणचे येथून परत खारेपाटणला येत होती. वायंगणी ताम्हणकरवाडी फाट्याच्या पुढे काही अंतरावर एका वळणावर खारेपाटणहून पोंभुर्लेच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी चालकाला समोरुन येणाऱ्या एसटीचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात खारेपाटण येथील यशवंत सुहास फाटक (२१) व तुषार सुहास फाटक (१९) हे दोन युवक जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी २.४५ वाजता खारेपाटण-मुटाट रस्त्यावर घडला.अपघाताची माहिती कळताच खारेपाटण वाहतूक नियंत्रक चंद्रकांत कांबळे व खारेपाटण पोलीस स्टेशनचे हवालदार प्रतीक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिंती घेतली. खारेपाटण-मणचे एसटीचालक एम. व्ही. जाधव व वाहक एस. बी. पन्हाळकर हे मणचे येथे बस घेऊन गेले व परत खारेपाटण येथे येत असताना दुचाकी चालक एसटीच्या मागच्या टायरजवळ आपटले व अपघात घडला.यावेळी तुषार सुहास फाटक हा गाडी चालवत होता. तर यशवंत सुहास फाटक हा त्याच्यामागे दुचाकीवर बसला होता. यामध्ये यशवंत याच्या पायाला व मांडीला दुखापत झाली असून तुषार याच्या उजव्या पायाला व तोंडाच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातग्रस्त युवकांना तातडीने खासगी गाडीने खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मंडावरे यांनी प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कणकवली येथे पाठविले.

या अपघाताची माहिती मिळताच कणकवली आगारप्रमुख नीलेश लाड यांनी उशिरा सायंकाळी खारेपाटण बसस्थानकाला भेट देत अपघाताची माहिती घेतली. या अपघातात एसटीचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी दुचाकीचे नुकसान झाले आहे. या अपघाताबाबत खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार प्रतीक जाधव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग