एस.टी. झाडावर आदळून अपघात
By Admin | Updated: October 1, 2014 00:47 IST2014-10-01T00:46:28+5:302014-10-01T00:47:49+5:30
वैभववाडी-तळेरे मार्गावर बांधवाडीनजीक खासगी आरामबसने हुलकावणी दिल्यामुळे

एस.टी. झाडावर आदळून अपघात
वैभववाडी : वैभववाडी-तळेरे मार्गावर बांधवाडीनजीक खासगी आरामबसने हुलकावणी दिल्यामुळे महामंडळाची निमआराम बस झाडावर आदळली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, निमआराम बसचे नुकसान झाले. दुपारी २.१५ च्या सुमारास हा अपघात झाला.
कोल्हापूर आगाराची पुणे-पणजी (क्र. एम. एच. ०६, एस-८३८९) निमआराम बस तळेरेकडे जात असताना बांधवाडी नजीकच्या उताराजवळ ट्रकला ओव्हरटेक करून नीता ट्रॅव्हल्सची (क्र. एम. एच. ०४, जी-९०८२) खासगी आरामबस समोरून अंगावर आली. त्यामुळे चालक पी. जे. शिरसाट बस नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात असताना रस्ता सोडून झाडावर आदळली. निमआराम बसमध्ये ३० प्रवासी होते. मात्र, सुदैवाने प्रवाशांना दुखापत झालेली नाही.
निमआराम बसचा चालक शिरसाट याने अपघाताची माहिती पोलिसांत दिली. दरम्यान, नीता ट्रॅव्हल्सच्या बसचा चालक नारायण बारीकराव शिंदे (रा. सातारा) याने शिरसाट यांच्या तक्रारीच्या तपशीलानुसार कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांना सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत निमआराम बस अपघातस्थळीच होती. (प्रतिनिधी)