शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणातील कुडाळ प्रांताधिकार्‍यांचे अधिकार काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:26 IST

highway, kudal, sindhudurgnews महामार्ग क्र. ६६ चे कुडाळ हद्दीतील कुडाळ उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडील सर्व कामकाज काढून घेऊन ते कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे देण्यात आले आहे. तसे आदेश कोकण विभागाचे उपायुक्त (महसूल) मनोज रानडे यांनी दिले आहेत. या आदेशामुळे कुडाळ हद्दीतील प्रकल्पग्रस्तांची मोठी गैरसोय होणार आहे.

ठळक मुद्देचौपदरीकरणातील कुडाळ प्रांताधिकार्‍यांचे अधिकार काढलेप्रकल्पग्रस्तांची होणार मोठी गैरसोय : ये-जा करण्यात वेळ, पैशाचा अपव्यय

कुडाळ : महामार्ग क्र. ६६ चे कुडाळ हद्दीतील कुडाळ उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडील सर्व कामकाज काढून घेऊन ते कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे देण्यात आले आहे. तसे आदेश कोकण विभागाचे उपायुक्त (महसूल) मनोज रानडे यांनी दिले आहेत. या आदेशामुळे कुडाळ हद्दीतील प्रकल्पग्रस्तांची मोठी गैरसोय होणार आहे.कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांच्या अखत्यारीत कसाल ते झाराप झीरो पॉईंटपर्यंत महामार्गाचा भाग येतो. या भागातील मूळ व पुरवणी निवाड्यातील प्रकल्पग्रस्तांचा शासनाकडून आलेला नुकसानीचा निधी मोठ्या प्रमाणात वाटप केला गेला. तरीदेखील अजूनही मूळ व पुरवणी निवाड्यातील जवळपास ८० कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी आहे. या वाटपात अनेक वादादित विषय आहेत. परिणामी, प्रत्येक प्रस्ताव डोळसपणे तपासून ती प्रकरणे निकाली काढावी लागत आहेत.सद्यस्थितीत गेल्या सहा महिन्यांत पुरवणी यादीतील ८४ कोटी रुपयांच्या निधीपैकी ४० कोटी रुपयांचे कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडून वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ४० कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी आहे. हे वाटप मृत खातेदार आणि बाहेरगावी असलेल्या व्यक्तींनी नोटिसा न स्वीकारल्यामुळे राहिले असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगितले जात आहे.कुडाळ हद्दीतील प्रकल्पग्रस्तांना आपल्या नुकसानीच्या निधीसाठी कणकवलीला ये-जा करावी लागणार आहे. हरकत घेणे, हरकतीच्या केसेसना उपस्थित राहणे,नोटीस स्वीकारायला जाणे आदी विविध कारणांसाठी प्रकल्पग्रस्त खातेदारांना कणकवलीला ये- जा करावी लागणार आहे. यात वेळ आणि पैशाचा मोठा अपव्यय होणार आहे.१५ दिवस काम राहणार ठप्प : प्रकल्पग्रस्तांची परवडमुंबई- गोवा महामार्ग क्र. ६६ मधील प्रकल्पग्रस्तांच्या नुकसानीचा निधी प्रकल्प सुरू झाल्यापासून कुडाळ उपविभागीय कार्यालयाकडून वाटप केला जात होता.मात्र, आता शेवटच्या टप्प्यात अधिकारी वर्गात तू -तू.. मैं-मैं च्या कारणामुळे कुडाळ उपविभागीय अधिकारी यांच्याकडून ते अधिकार काढून कणकवली उपविभागीय अधिकार्‍यांकडे देण्यात आले आहेत; पण हा पदभार द्यायलाच १५ दिवसांचा अवधी जाणार आहे. म्हणजेच हे १५ दिवस याबाबतचे काम पूर्णतः ठप्प राहणार आहे. दुसरीकडे या निर्णयामुळे कुडाळ हद्दीतील प्रकल्पग्रस्तांचीही मोठी परवड होणार आहे.

टॅग्स :highwayमहामार्गkudal-acकुडाळsindhudurgसिंधुदुर्ग