सांगवे येथील मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

By Admin | Updated: June 5, 2014 00:33 IST2014-06-05T00:33:42+5:302014-06-05T00:33:54+5:30

खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

Son of Sangve died by snake bite | सांगवे येथील मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

सांगवे येथील मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

कणकवली : सांगवे केळीचीवाडी येथील शुभम संतोष सावंत (वय १४) या मुलाला सर्पदंश झाला. येथील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली. सांगवे केळीचीवाडी येथील शुभम सावंत हा घराच्या परिसरात रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खेळत होता. यावेळी त्याला काहीतरी टोचल्यासारखे झाले. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. सायंकाळी जोरदार वेदना होऊ लागल्याने त्याने याबाबत कुटुंबियांना माहिती दिली. कनेडी येथील खासगी दवाखान्यात त्याला उपचारासाठी नेण्यात आले. शुभम याला सर्पदंश झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला कणकवली येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण, काका, काकी असा परिवार आहे. सांगवे येथील नळ कामगार संतोष सावंत यांचा शुभम हा मुलगा असून त्याच्या निधनाने सांगवे गावावर शोककळा पसरली. (वार्ताहर)

Web Title: Son of Sangve died by snake bite