जिल्ह्यातील वीज वितरणच्या समस्या सोडवा
By Admin | Updated: May 29, 2015 23:45 IST2015-05-29T22:10:36+5:302015-05-29T23:45:50+5:30
जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन : कुडाळ राष्ट्रवादीने घेतली अधिकाऱ्यांची भेट

जिल्ह्यातील वीज वितरणच्या समस्या सोडवा
जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन : कुडाळ राष्ट्रवादीने घेतली अधिकाऱ्यांची भेटकुडाळ : कुडाळ येथे नवीनच नियुक्त झालेले महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. आर. बांबळे यांची कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत केले. तसेच जिल्ह्यातील एमएसईबीच्या समस्या सोडवून जनतेला चांगली सेवा देण्याची विनंती केली. यावेळी महावितरणकडून जनतेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्हा महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंतापदी एस. आर. बांबळे यांनी पदभार स्वीकारला. कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष दादा बेळणेकर, प्रदेश सरचिटणीस अमित सामंत, भास्कर परब, साबा पाटकर, संग्राम सावंत, लालू पटेल, नीलेश उमळकर, अशोक कांदे, धीरज पांचाळ, बाबल आळवे, अखिलेश होडावडेकर, सजीष गुरव आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीकडून जनतेला उद्भवणाऱ्या अनेक समस्या मांडल्या. जीर्ण झालेले विद्युत खांब, खराब झालेल्या विद्युत वाहिन्या, डीपी बॉक्स, वाहिन्यांवर धोकादायक वाढलेली झाडे याबाबत पावसाळ््यापूर्वी कार्यवाही न झाल्यास पावसाळ््यात धोकादायक स्थिती उद्भवते आणि त्याचा त्रास ग्राहकांना सोसावा लागतो. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी दुरुस्ती करून ग्राहकांना होणारा त्रास वाचविण्याची मागणी केली.
तसेच जिल्ह्यात वीज बिल थकबाकीचे प्रमाण कमी आहे. ग्राहक प्रामाणिकपणे वीज बिल भरतात. मात्र, आपले महावितरणकडून जनतेला अपेक्षित सहकार्य मिळत नाही. तसेच येथील महावितरणच्या समस्यांमुळे अनेक अपघातही घडले असून काही जणांना जीव गमवावा लागला आहे. अपघातग्रस्तांची कुटुंबे वाऱ्यावर पडली. परंतु, त्यांच्या कुटुंबांकडे लक्ष द्यायला कंपनीला वेळ मिळाला नाही, अशी खंतही यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आतातरी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दूर करून जनतेला अपेक्षित सेवा द्या, अशी विनंती करण्यात आली. (प्रतिनिधी)