धनगर समाजाच्या २० घरांना सोलर वीज
By Admin | Updated: September 22, 2016 00:42 IST2016-09-22T00:42:29+5:302016-09-22T00:42:29+5:30
भगीरथ प्रतिष्ठानचा उपक्रम : वीज झळकल्याने आनंदाचे वातावरण

धनगर समाजाच्या २० घरांना सोलर वीज
साटेली-भेडशी : दोडामार्ग तालुक्यातील धनगर समाजातील २० धनगर कुटुंबांना भगीरथ प्रतिष्ठानने ‘सोलर वीज’ दिली. यामुळे धनगरांंच्या घरात वीज झळकल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
भगीरथ प्रतिष्ठानने तत्काळ वीज नसलेल्या २० कुटुंबांना सोलर दिवे दिल्याबद्दल तालुकाध्यक्ष सखाराम झोरे यांनी श्री भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांचे कौतुक केले. यावेळी दोडामार्ग केंद्रशाळेचे मुख्याध्यापक गावित, मंडळाचे उपाध्यक्ष भैरू वरक, सचिव डॉ. चिन्मय पटकारे, खनिजदार महेश काळे, सदस्य लक्ष्मण गावडे, विठू बोडेकर, सिद्धेश पटकारे, संतोष पटकारे, आदी उपस्थित होते. आभार महेश काळे यांनी मानले. स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष डोईफोडे, सरचिटणीस नवल जावडे यांनी अभिनंदन केले व भगीरथ प्रतिष्ठानचे आभार मानले. (प्रतिनिधी)