शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाला सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, रत्नागिरीत प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 16:19 IST

सावंतवाडी : माणगाव (ता. कुडाळ) येथील डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाला आर्टस् सर्कल, रत्नागिरी यांच्यावतीने देण्यात येणारा सामाजिक कृतज्ञता ...

ठळक मुद्दे हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाला पुरस्काररत्नागिरीत गौरव :सामाजिक कृतज्ञता पुरस्कर प्रदान

सावंतवाडी : माणगाव (ता. कुडाळ) येथील डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाला आर्टस् सर्कल, रत्नागिरी यांच्यावतीने देण्यात येणारा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार २०१८  प्रदान करण्यात आला. आर्टस् सर्कल संस्थेचे व्यवस्थापक मनोज देसाई यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार संस्थेचे व्यवस्थापक एकनाथ सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आर्टस् सर्कलतर्फे पुलोत्सवांतर्गत हा पुरस्कार देण्यात आला.कोकणात सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना लोकांपर्यंत पोहोचवून नागरिकांमधील इच्छुक दात्यांना संस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी आर्टस् सर्कलतर्फे हा पुरस्कार दिला जातो. डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प या संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मिती करून तरूणांचे शहराकडे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संस्थेच्या या विशेष कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी प्रकल्पाबाबत माहिती देताना एकनाथ सावंत म्हणाले, या प्रकल्पाची स्थापना १९८९ साली केशव बळिराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त करण्यात आली. सिंधुुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांमधून तरूणांनी उद्योग-व्यवसाय स्वत: निर्माण करावा आणि नोकरी-धंद्यानिमित्त गाव सोडून बाहेरगावी जाण्याऐवजी आपल्या मातीतच पैशाचे मळे फुलवावेत, या हेतूने संस्थेची निर्मिती झाली आहे.जैविक शेती, ससे पालन गोपालन, फळ प्रक्रिया उद्योग, कंपोस्ट, गांडूळ खत निर्मिती, भाजीपाला उत्पादन या गोष्टींबरोबरच संगणक प्रशिक्षण आदी अभ्यासक्रमांची सेवा या संस्थेमार्फत दिली जाते. त्यामुळे असंख्य तरूणांना यापासून प्रेरणा मिळते, असे सांगितले.डॉ. बाबासाहेब लेले स्मारक समिती, माणगाव संचलित डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी