सामाजिक उपक्रमांना सहकार्य राहील
By Admin | Updated: January 1, 2015 00:17 IST2014-12-31T21:03:09+5:302015-01-01T00:17:11+5:30
विनायक राऊत : ‘अखंड भगवा महोत्सव’ अंतर्गत रक्तदान शिबिर

सामाजिक उपक्रमांना सहकार्य राहील
कुडाळ : बाळासाहेबांना अभिप्रेत काम पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुका शिवसेना करीत आहे. सामाजिक उपक्रमांना माझे सहकार्य राहील, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने ‘अखंड भगवा महोत्सव’ अंतर्गत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आदी उपस्थित होते. यावेळी अरुण दुधवडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच आमदार वैभव नाईक यांनीही गौरवोद्गार काढले. आकेरी शिवसेना शाखेने यशस्वीरीत्या या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल खासदार राऊत यांनी शाखेचा सत्कार केला.
या शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवा सेनाप्रमुख मंदार शिरसाट, शेखर राणे, सुशील चिंदरकर, बबन बोभाटे, जीवन बांदेकर, नितीन सावंत, सुयोग ढवण, महेश जामदार, श्रेया परब, वर्षा कुडाळकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय शिरसाट, सूत्रसंचालन बबन बोभाटे यांनी केले. (प्रतिनिधी)