शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

..तर माझी सुरक्षा काढून दीपक केसरकरांना द्या - आमदार वैभव नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 17:54 IST

दरवेळी निवडणूक जवळ आली किंवा पक्षांतर करायचे असेल त्यावेळी केसरकर यांची सुरक्षितता धोक्यात येते.

कणकवली : राज्याचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना सुरक्षा वाढवून द्यावी असे पत्र गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना आपण दिले आहे. तसेच याकरिता जर पोलीस कमी पडले तर माझी असलेली सुरक्षा काढून केसरकर यांना द्यावी अशी देखील मागणी केली असल्याची माहिती शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली.दरवेळी निवडणूक जवळ आली किंवा पक्षांतर करायचे असेल त्यावेळी केसरकर यांची सुरक्षितता धोक्यात येते. तसे नेहमी केसरकर यांचे म्हणणे असते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता शांत आहे. सध्याच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांच्या विरोधात त्यांच्या कार्यालयासमोर किंवा अन्य ठिकाणी शिवसैनिकांनी कोणत्याही घोषणा दिलेल्या नाहीत. दरवेळी पक्षांतर करताना केसरकर यांना सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित का करावा लागतो? याचे आत्मचिंतन केसरकर यांनी करावे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केसरकरांना पाच वर्षे गृहराज्यमंत्री पद दिले होते. याचे भान केसरकरांनी बोलताना ठेवावे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुणाचीही सुरक्षा काढलेली नाही किंवा कुणाला सुरक्षा दिलेली नाही. राणेंचा दहशतवाद नेमका कोणी मोडून काढला आहे ते जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. झेंडे घ्यायला कार्यकर्ते नसताना राणे यांच्या विरोधात कोणी उमेदवारी भरली हे देखील माहिती आहे. अनेकदा केसरकर सांगत असतात की राणेंचा दहशतवाद मोडून काढला. पण खरा दहशतवाद कोणी मोडला हे शिवसैनिक व जनतेला माहिती आहे.जीव धोक्यात घालून राणेंच्या विरोधात उमेदवारी भरली२००९ मध्ये माझा जीव धोक्यात घालून मी राणेंच्या विरोधात उमेदवारी भरली. त्या वेळी मला ५० हजार मते मिळाली. दोन वेळा माझा जीव वाचला होता. राणेंच्या वीस - वीस गाड्या माझ्या पाठलागावर होत्या. मात्र याचा आम्ही केव्हा बाऊ केला नाही. मी माझे हे मोठेपण यापूर्वीही सांगितले नाही व यापुढेही सांगणार नाही. मात्र, आता प्रश्न उपस्थित झाला म्हणून सांगत आहे.      म्हणून दहशतवादाच्या नावाने टाहो फोडू लागलेकेसरकर यांचा दहशतवादाचा मुद्दा निवडणूक आली की सहा महिने अगोदर येतो. गेल्या अडीच वर्षात केसरकर यांना हा दहशतवाद दिसला नाही. मात्र, आता सरकार बदलते म्हटल्यानंतर ते दहशतवादाच्या नावाने टाहो फोडू लागले आहेत असा टोला नाईक यांनी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Dipak Kesarkarदीपक केसरकरShiv Senaशिवसेना