शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

खरीप हंगामात आतापर्यंत ८२ हजार क्विंटल भात खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 16:17 IST

Kudal Sindhdurg : खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२ हजार २५९ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यात सर्वाधिक भात खरेदी झाली आहे. कुडाळमध्ये ११ भात खरेदी केंद्रांमधून एकूण २६ हजार ६३२ क्विंटल भात खरेदी झाली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगामात आतापर्यंत ८२ हजार क्विंटल भात खरेदीसिंधुदुर्गबरोबरच कुडाळ तालुक्यात उच्चांकी भात खरेदी

कुडाळ : खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२ हजार २५९ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यात सर्वाधिक भात खरेदी झाली आहे. कुडाळमध्ये ११ भात खरेदी केंद्रांमधून एकूण २६ हजार ६३२ क्विंटल भात खरेदी झाली आहे.जिल्ह्यात गतवर्षी ३६ हजार ८८२ क्विंटल भात खरेदी करण्यात आली होती. मात्र, यावर्षी भात पिकाचे उत्पन्न वाढवून जास्तीत जास्त भात खरेदी होऊन शेतकऱ्यांना याचा लाभ होण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सिंधुदुर्गबरोबरच कुडाळ तालुक्यात उच्चांकी भात खरेदी झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीक हे प्रमुख पीक असून यांत्रिकीकरणाद्वारे भात लावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. शेतकऱ्यांना भात पिकातून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी आणलेल्या चांदा ते बांदा योजनेतून कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेतकऱ्यांना शेती अवजारे सबसिडीतून मिळवून देण्यासाठी वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते.शेती अवजारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात लागवड करून उत्पादन घेतले. या भात उत्पादनासाठी खरेदी केंद्रे निश्चित करून लवकरात लवकर भात खरेदी केंद्रे सुरू करणे तसेच शासनाकडून भात पिकाला जास्तीत जास्त हमीभाव व बोनस मिळवून देणे यासाठी वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व शासनस्तरावर पाठपुरावा केला.त्यामुळे २०२०-२१ मध्ये ऑक्टोबर महिन्यापासून भात खरेदीला सुरुवात करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी एकूण ३५ भात खरेदी केंद्रे निश्चित केली होती. शासनाने हमीभावात ५३ रुपयांची वाढ केली असून १८६८ रु हमीभाव देण्यात येत आहे. तसेच बोनस स्वरूपात ७०० रुपये देण्यात येणार असून एकूण २५६८ रुपये दर शेतकऱ्यांना दिला जात आहे. जिल्ह्यात एकूण १५ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांच्या भात खरेदीची नोंद झाली आहे. त्यातील ११ कोटी रुपये शासनाकडून जमा झाले आहेत. याव्यतिरिक्त बोनसची रक्कम मिळणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ हजार ८९० तर कुडाळ तालुक्यातील १ हजार ८८९ शेतकऱ्यांनी भात विक्री केली आहे. कुडाळ शहरातील भात खरेदी केंद्रावर ९ हजार ६३ क्विंटल भात खरेदी झाली तर निवजेसारख्या ग्रामीण भागातील भात खरेदी केंद्रावर ३ हजार ९०५ क्विंटल भात खरेदी झाली. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांमुळे कुडाळ येथे साकारलेल्या राईस मिल मार्फतही भाताची खरेदी करण्यात आली.

बजाज राईस मिलने थेट शेतकऱ्यांमार्फत भात खरेदी करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते. त्याला देखील पालकमंत्र्यांकडून मान्यता देण्यात आल्याने राईस मिलमार्फत खरेदी केंद्रे निश्चित करून थेट शेतकऱ्यांकडून भाताची उचल करण्यात आली. अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एन. जी. गवळी यांनी दिली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळ