शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

..म्हणून दीपक केसरकर राणेंचे गोडवे गातायत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंचे टीकास्त्र 

By अनंत खं.जाधव | Updated: January 19, 2023 16:23 IST

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न जाणीवपुर्वक रेंगाळला जात आहे.

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जीवावर आमदार म्हणून निवडून आलेल्या दीपक केसरकर यांनी त्यांना नरकासुर, राणेंनी दहशतवाद जिल्ह्यात आणला, राक्षस, लोकांची कुंकू पुसली अशा वेगवेगळ्या उपाधी दिल्या. अन् तेच केसरकर आता राणेंचे गोडवे गात आहेत. केसरकरांची पाऊले भाजपच्या दिशेने पडायला लागली असून त्यांचा लोकसभेचा प्रचार केल्यास आपला ते विधानसभेचा प्रचार करतील असे त्यांना वाटत असल्याची टिका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केली.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, शहर अध्यक्ष देवा टेमकर, सायली दुभाषी, इफ्तिकार राजगुरू, संदिप राणे, नाना सावंत, राकेश नेवगी आदी उपस्थित होते.भोसले म्हणाले, आयत्यावेळी नारायण राणेंनी नकार दिला तर आपल्याला भाजपाची दारे बंद होवू शकतात, हे लक्षात आल्यामुळेच पुन्हा एकदा मंत्री केसरकर यांनी आपला “ढोंगीपणा” सुरू केला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे आपल्या कामापुरती तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असाच आहे. दोन वेळा मंत्रीपद असतानाही त्यांना आपल्या मतदार संघाचा विकास करायला जमला नाही. येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न जाणीवपुर्वक रेंगाळला जात आहे.

तर दुसरीकडे चष्म्याचा कारखाना, एक लाख सेटटॉप बॉक्स, सिक्युरीटी गार्ड ट्रेनिंग सेंटर ही सर्व आश्वासने हवेत विरली आहे. त्यांना सर्वसामान्य मतदारांचे काहीएक पडलेले नाही. फक्त स्वार्थ साधून स्वतःची तुंबडी भरुन घ्यायची, असा एक वचनी कार्यक्रम त्यांच्याकडुन सुरू आहे. 

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटला मुद्दा केवळ केसरकरांच्या वेळ काढू पणा मुळे राहिला. तो सुटणे गरजेचे होते. तर अशा लोकांच्या प्रश्नासाठी अण्णा केसरकरांसारखी जेष्ठ व्यक्ती आत्मदहनाचा निर्णय घेते हे योग्य नाही. मंत्रीपदात एकही मोठा प्रकल्प करता आला नाही हेच दुर्देव आहे. त्यामुळे आता जनतेने सावध व्हावे. मी मंत्री असतना अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले मग हे दोनदा मंत्री झाले त्यांना जिल्ह्याचा का विकास करता येत नाही असा सवाल देखील भोसले यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर BJPभाजपाNarayan Raneनारायण राणे