शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

..म्हणून काँग्रेसकडून लोकसभेसाठी स्वबळावर लढण्याचा सर्व्हे - नितेश राणे 

By सुधीर राणे | Updated: January 5, 2024 18:41 IST

..त्यासाठीच प्रंतप्रधान मोदींना टार्गेट 

कणकवली: ठाकरे सेना आपल्या पक्षामध्ये विलीन करावा असा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने  ठाकरे सेना संपविण्याचा घाट घातला आहे. असा खळबळजनक आरोप करतानाच, त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याचा सर्व्हे करत आहे. असे आमदार नितेश राणे यांनी येथे सांगितले.कणकवली येथे शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, अदानी समूहाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्वाचा निकाल दिला आहे. त्यांच्या उद्योगामुळे आपला देश प्रगती पथावर आहे. असे असताना विरोधक हिंडनबर्ग रिपोर्टच्या नावाखाली देशाची बदनामी करत होते. तो प्रकार न्यायालयाने हाणून पाडला आहे. त्यामुळे मिर्ची झोंबल्याने  आणि १० जनपथची मर्जी सांभाळण्यासाठी संजय राऊत यांनी गरळ ओकली आहे. मात्र, त्यांचे महागुरू शरद पवार हे अदानींना का भेटतात? हे प्रथम संजय राऊत यांनी जाणून घ्यावे. अदानीवर बोलण्यापूर्वी सिल्वर ओकमध्ये अदानीबाबत काय मत आहे, हे विचारून नंतरच बोलावे, असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला.त्यासाठीच प्रंतप्रधान मोदींना टार्गेट काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना देशातील सनातन हिंदू धर्म संपवायचा आहे. त्यासाठीच प्रंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले जात आहे. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते यात यशस्वी होणार नाहीत. सातत्याने संजय राऊत न्यायालयाचा अपमान करत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर 'सुमोटो' कारवाई न्यायालयाने करून त्यांना अटक करावी. प्रभू श्री राम यांचा अपमान झाल्यानंतर तो कुठलाही हिंदू सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाड हे पाकिस्तानमध्ये राहत नाहीत. भारतातच राहतात, त्यामुळे त्यांनी बोलताना दक्षता घ्यायला हवी असेही राणे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcongressकाँग्रेसNitesh Raneनीतेश राणे