शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: मांडवी एक्स्प्रेसमधून आगीसह धुरांचे लोट, जीव धोक्यात घालून प्रवाशांनी मारल्या उड्या

By अनंत खं.जाधव | Updated: November 1, 2023 13:44 IST

सावंतवाडी रेल्वे स्थानकात द बर्निग ट्रेनचा थरार 

सावंतवाडी : मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेसमधून सावंतवाडीरेल्वे स्थानकात द बर्निग ट्रेन चा थरार अनुभवायला मिळाला. रेल्वेच्या बोगीमधून आगीसह धुराचे लोट पाहायला मिळाले. अचानक घडलेल्या घटनेनंतर रेल्वे थांबवून पाणी मारून तसेच अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात आली.आगीचे कारण समजू शकले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार हा प्रकार ब्रेकमधील तांत्रिक दोषामुळे घडल्याची शक्यता आहे. ही घटना आज, बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मात्र प्रवाशात एकच खळबळ उडाली. अनेक प्रवाशांनी जीव धोक्यात घालून प्लॅटफॉर्मवर उड्या मारल्या.  मडगाव येथून मुंबईच्या दिशेने सकाळी निघालेली ‘मांडवी एक्सप्रेस’ मडुरे स्थानकावर पोहोचली. सावंतवाडी स्थानक पासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असताना जनरेटर कार, दिव्यांग व गार्डसाठीच्या शेवटच्या डब्याच्या खालून आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. यामुळे सावंतवाडी स्थानकावर रेल्वेगाडी थांबवण्यात आली. रेल्वे कर्मचार्‍यांनी स्थानकावरील अधिकार्‍यांना आगीबाबत माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले. उपस्थित कर्मचार्‍यांनाही आग लागण्याचे नेमके कारण समजलेले नाही. मात्र, रेल्वेच्या डब्याला असलेल्या डिस्क ब्रेकमधील पॅड जळाल्याचा वास आल्याने ब्रेकमधील काही तांत्रिक कारणांमुळे आग लागल्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेfireआगSawantwadiसावंतवाडी