सहाव्या आरोपीला बेळगावात अटक अत्याचार प्रकरण
By Admin | Updated: August 21, 2014 00:28 IST2014-08-21T00:08:30+5:302014-08-21T00:28:03+5:30
पाचजणांना सात दिवसांची कोठडी

सहाव्या आरोपीला बेळगावात अटक अत्याचार प्रकरण
सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी येथे युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी पाच आरोपींना काल, मंगळवारी अटक करण्यात आले होते, तर फरार असलेला सहावा आरोपी सुफियान शेख याला आज पहाटे बेळगाव येथून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या सहा संशयित आरोपींपैकी पाच आरोपींना २६ आॅगस्टपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे, तर अल्पवयीन असलेल्या स्वरूप आरेकर याला बालसुधारगृहात पाठविण्याचा निर्णय दिला. सावंतवाडी येथे एका युवतीवर अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित आरोपी अमित महादेव मोर्ये, आदित्य सुदन्वा आरेकर, मंगेश नीळकंठ सावंत, नंदकिशोर बाळकृष्ण गावडे, स्वरूप हेमंत आरेकर, सुफियान महबूब शेख यांना आज, बुधवारी ओरोस येथील न्यायालयात उभे केले असता विशेष न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी सहा संशयित आरोपींपैकी पाचजणांना पोलीस कोठडी, तर यातील अल्पवयीन असलेल्या स्वरूप आरेकर याला बालसुधारगृहात ठेवण्याचा निर्णय दिला. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. अमोल सामंत यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)