शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

देवगडात एकाच दिवशी सहा कासवे सापडली, जाळ्यात अडकल्याने चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 4:28 PM

देवगड बीच, तारामुंबरी व कुणकेश्वर या ठिकाणी एकाच दिवशी सहा कासवे सापडली आहेत. यातील चार कासवे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देदेवगडात एकाच दिवशी सहा कासवे सापडली, जाळ्यात अडकल्याने चार जखमी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार, बरी झाल्यानंतर सोडणार

देवगड : देवगड बीच, तारामुंबरी व कुणकेश्वर या ठिकाणी एकाच दिवशी सहा कासवे सापडली आहेत. यातील चार कासवे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.देवगड तालुक्यातील देवगड, तारामुंबरी व कुणकेश्वर या किनारपट्टी भागात सोमवारी मच्छिमारांना सहा कासवे जाळ्यात अडकलेल्या स्थितीत सापडली. सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास कुणकेश्वर मंदिरानजीक आॅलिव्ह रिडले जातीचे कासव जखमी अवस्थेत सापडले. सागरसुरक्षा रक्षक अमित बांदकर, अभिषेक कोयंडे, जीवरक्षक भुजबळ यांनी माहिती दिल्यानंतर तारामुंबरी येथील गोविंद खवळे, अक्षय खवळे, दीपक खवळे यांनी कासवाची सुटका केली. मात्र, कासवाचा पुढील पाय नसल्याचे दिसले. तारामुंबरी येथे आणून त्या कासवावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे यांनी उपचार केले.देवगड बीचवरही महेश सागवेकर, पप्पू कदम, अवी खडपकर, अमित सकपाळ, निलेश सावंत, अमोल तेली, यशवंत भोवर यांना जखमी अवस्थेत कासव आढळले. त्या कासवाला सर्वांनी जाळे कापून जीवदान दिले. या कासवाचा पुढील पाय कापला गेला होता तर मागील पायाला जखम झाली होती. या कासवावरही उपचार करण्यात आले.सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मच्छिमार हरम यांना तारामुंबरी येथे दोन कासवे जाळ्यात अडकलेली दिसली. त्यांनी तत्काळ तारामुंबरी येथील निसर्गप्रेमी युवकांना संपर्क साधला. यावेळी हितेश खवळे, अक्षय खवळे, ज्ञानेश्वर सारंग, दीपक खवळे यांनी धाव घेऊन जाळ्यात अडकलेल्या दोन्ही कासवांना जीवदान दिले.एका कासवाचा पुढील पाय नव्हता व दुसऱ्या पायाला जखम झाली होती. दुसऱ्या कासवाचा पुढील पाय कातरलेला होता. या कासवांवरही उपचार करण्यात आले. जखमी कासवे तारामुंबरी येथील भैरवनाथ बचतगटाच्या मत्स्यपालन प्रकल्पात ठेवण्यात आली असून ती बरी झाल्यानंतर पाण्यात सोडण्यात येणार आहेत.जखमी कासवांवर उपचार करण्यासाठी पालघर, डहाणू धर्तीवर जिल्ह्यात रुग्णालय व्हावे अशी मागणी लक्ष्मण तारी यांनी कांदळवन विभाग मुंबई व वनविभाग सिंधुदूर्ग यांच्याकडे केली आहे. तसेच देवगडमधील स्थानिक निसर्गप्रेमी मंडळींना जीव संवर्धन व त्यांच्या उपचारासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात यावे अशीही मागणी केली आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्ग