वैभववाडीतील सहा दुकाने चोरट्यांनी फोडली
By Admin | Updated: June 26, 2017 16:18 IST2017-06-26T16:18:58+5:302017-06-26T16:18:58+5:30
रविवारी रात्री अंधारचा फायदा घेत चोरट्यांनी वैभववाडी शहरातील व्यापारी संकुलास "टार्गेट" केलं.

वैभववाडीतील सहा दुकाने चोरट्यांनी फोडली
>ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 26- रविवारी रात्री अंधारचा फायदा घेत चोरट्यांनी वैभववाडी शहरातील व्यापारी संकुलास "टार्गेट" केलं. वैभववाडी बस स्थानकासमोरच्या बाणे कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलातील सहा दुकानांच्या गाळ्यांची शटर्स उचकटून काही रक्कम चोरट्यांनी लंपास केली. गस्तीवरील पोलिसांची चाहूल लागताच लोखंडी सळ्या संकुलात टाकून चोरट्यांनी धूम ठोकली.
व्यापारी संकुलातील बेकरी, विमा प्रतिनिधी संपर्क कार्यालय, केशकर्तनालय अशा सहा दुकानाची शटर्स उचकटून टाकली. पी.के. तथा बाळासाहसावंत पतसंस्थेचेही शटर्स तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. पोलिसांनी पंचनामा केला असून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरु केली आहे. तसेच ठसे तज्ञांच्या पथकास पाचारण केले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील व्यापारी संकुलास चोरट्यांनी टार्गेट केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे चोरटे या संधीचा फायदा उठविण्याची शक्यता निर्माण झाली आहे