फसवणूकप्रकरणीआठ जणांना अटक
By Admin | Updated: October 31, 2014 23:36 IST2014-10-31T23:34:04+5:302014-10-31T23:36:13+5:30
कोकण मर्कंटाईल : नकली दागिन्यांवर घेतले कर्ज

फसवणूकप्रकरणीआठ जणांना अटक
देवरुख : नकली दागिन्यांवर कर्ज घेऊन तब्बल ३९ जणांच्या टोळक्याने कोकण मर्र्कं टाईल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी ४ आॅक्टोबर रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. या खळबळजनक घटनेच्या तपासाला आता वेग आला असून, शुक्रवारी सायंकाळी यातील आठ संशयित आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी आरोपींची माहिती पोलिसांकडून घेतला जात आहे.
आता अटक करण्यात आलेल्यांची संख्या ९ पर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी आस्मा शौखत शेख कसबा (कसबा शास्त्रीपूल) या महिलेला अटक करण्यात आली होती. दरम्यानच्या चार दिवसानंतर शुक्रवारी यात आठ जणांना संगमेश्वर पोलिसांनी अटक करुन देवरुख न्यायालयात हजर केले. या आठ जणांमध्ये सुचित्रा चंद्रशेखर महाडिक (रा. कसबा राववाडी), रईसा अब्बास नायकोडी, हाफिजा मजिद नायकोडी (दोन्ही रा. कसबा शास्त्रीपूल), रजिया गुलाम निलानी कुरेशी (रा. माखजन), सोहनलाल गेसूलाल प्रजापती (रा. बाजारपेठ, संगमेश्वर) तसेच नसिमा अब्दुल्ला नाईक (कसबा शास्त्रीपूल), जाहिदा नाझिर आंबेडकर (रा. आंबेड बु.) आणि फहीम अब्दुल्ला नाईक (रा. कसबा) यांचा समावेश आहे. यांनी ११ मे २०१२ ते १९ सप्टेंबर २०१४ या कालावधीत बनावट दागिने गहाण ठेवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींनादेखील लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. फिर्याद कोकण मर्र्कं टाईल बँकेचे मुंबईचे व्यवस्थापक अकबर युसूफ कोंडकरी यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणामध्ये ३९ जणांच्या टोळक्याने बँकेची २ कोटी ८२ लाख ७७ हजार ६४९ रुपयांची फसवणूक केली होती. त्याचा तपास चालू आहे. या बॅँकेत अनेकांनी नकली दागिने देऊन त्यावर कर्ज घेतल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हाभरात खळबळ माजली होती.
बनावट सोनेतारण प्रकरणामध्ये आज आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर चिखले हे करीत आहेत. दरम्यान, आज उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांनी भेट दिली. (प्रतिनिधी)