शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळेत बांधले ६ वनराई बंधारे, ग्रामपंचायतीचा आदर्शवत उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 16:51 IST

देवगड : दाभोळे ग्रामपंचायतीच्या वतीने दाभोळे गावामध्ये ६ वनराई बंधारे पहिल्या टप्यामध्ये बांधण्यात आले आहेत.

देवगड : दाभोळे ग्रामपंचायतीच्या वतीने दाभोळे गावामध्ये ६ वनराई बंधारे पहिल्या टप्यामध्ये बांधण्यात आले आहेत. या बंधा-यांची पाहणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी केली असून, या ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन असेच बंधारे तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी बांधावे असे त्यांनी सांगितले.देवगड तालुक्यामध्ये ७२ ग्रामपंचायतीमध्ये ९०० वनराई व कच्चे बंधा-यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. दाभोळे ग्रामपंचायतीला १६ बंधा-यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून यामधील ६ वनराई बंधारे बुधवारी बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. दाभोळे गावातील महिला बचतगट, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून जलसंधारणासाठी बांधण्यात आले आहेत.या बंधा-यांची पाहणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कमलाकर रणदिवे, देवगड सभापती जयश्री आडिवरेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, उपसभापती संजय देवरुखकर, पंचायत समिती सदस्य प्राजक्ता घाडी, विस्तार अधिकारी शिंदे तसेच जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांनी पाहणी केली. यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत म्हणाल्या की, देवगड तालुक्यातील सर्वप्रथम वनराई बंधारे बांधण्याचा मुहूर्त दाभोळे ग्रामपंचायतीने केला असून, अतिशय नियोजनबद्ध बंधा-यांचे काम केले आहे. हजारो लिटर पाणी अडवून या गावातील भविष्यात होणारी पाणीटंचाई नक्कीच या बंधा-याने रोखली जाऊ शकते.ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधण्यात आलेले दाभोळे गावातील हे बंधारे देवगड तालुक्यातील नक्कीच आदर्श ठरून इतर गावातीलही बंधारे अशाच स्वरूपाचे बांधण्यात यावेत, असे सांगण्यात आले. यावेळी दाभोळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रदीप नारकर यांच्या पुढाकाराने व नियोजनबद्ध बंधारे बांधण्याचे नियोजन केल्याने योग्य पद्धतीने बंधारे बांधण्यात आले आहेत.१६ बंधा-यांचे उद्दिष्टयावेळी बोलताना ग्रामसेवक नारकर म्हणाले की, दाभोळे गावात भविष्यात पाणीटंचाई होता कामा नये. तसेच बंधारे बांधून अडविण्यात आलेल्या पाण्याचा उपयोग येथील शेतीसाठी तसेच पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करण्यासाठी होणार आहे. याचा फायदा हा दाभोळे गावातील ग्रामस्थांनाच होणार आहे. तालुकास्तरावरून दाभोळे ग्रामपंचायतीला १६ बंधा-यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्यातील ६ बंधारे बांधण्यात आले आहेत. उर्वरित १० बंधारेही काही दिवसांत बांधण्यात येणार असल्याचे नारकर यांनी सांगितले.हे बंधारे बांधण्यासाठी दाभोळे गावचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान समन्वयक बांदेकर, गावातील जिल्हा प्राथमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या सदस्य व ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDamधरण