शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! चक्क सख्ख्या भावानेच केले बहिणीवर अत्याचार, तक्रारदार युवती गर्भवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 17:36 IST

सावंतवाडी तालुक्यातील एका गावात भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चक्क सख्ख्या भावानेच बहिणीवर अत्याचार केले असून, बहीण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देचक्क सख्ख्या भावानेच केले बहिणीवर अत्याचार, तक्रारदार युवती गर्भवतीभावा-बहिणीच्या नात्याला काळिमा, सावंतवाडी तालुक्यात खळबळ

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील एका गावात भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चक्क सख्ख्या भावानेच बहिणीवर अत्याचार केले असून, बहीण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. याबाबत बहिणीने नवी मुंबई येथील वाशी पोलीस ठाण्यात भावाविरोधात तक्रार दिली असून, ती शून्य नंबरने सावंतवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.सावंतवाडी तालुक्यातील एका गावातील कुटुंबात आई, भाऊ व बहीण असा परिवार राहतो. बहिणीचे शिक्षण येथील एका महाविद्यालयात झाले असून, ती शिक्षणाच्या काळात सावंतवाडी येथेच राहत होती. फक्त शनिवार-रविवारीच आपल्या घरी जात होती. याच दरम्यान भावाने आई घरात नसल्याचा फायदा उठवित बहिणीवर अत्याचार केले. तसेच याची माहिती जर बाहेर कुठे दिली तर ठार मारण्याची धमकीही दिली.ही मुलगी अलीकडेच नवी मुंबई-वाशी येथे आपल्या बहिणीकडे राहण्यास गेली. यावेळी तिला थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात तपासणीसाठी गेली असता तेथे तिच्या वेगवेगळ््या चाचण्या करण्यात आल्या. यात ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले. त्यानंतर याबाबत वाशी पोलिसांना माहिती देण्यात आली. वाशी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अत्याचारग्रस्त मुलीची तक्रार नोंदवून घेतली आहे.बलात्काराचा गुन्हासावंतवाडी पोलिसांनी वाशी पोलिसांकडून आलेल्या कागदपत्रांच्या आधारे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्ग